भूगाव-भूकुम रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

बावधन - भूगाव-भूकुमदरम्यान रस्त्याची भरतनगर परिसरात दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी हा रस्ता खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी 
केली आहे.

बावधन - भूगाव-भूकुमदरम्यान रस्त्याची भरतनगर परिसरात दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी हा रस्ता खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी 
केली आहे.

चांदणी चौकापासून पिरंगुटकडे जाणाऱ्या या मार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. भूगावच्या रामनदीपासून खड्ड्यांना सुरवात होते. बॅंक ऑफ महाराष्ट्रसमोर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. भूगावच्या पुढेही या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.  माताळवाडी फाट्यावर लांबलचक खड्डे पडले आहेत. मानस तलावाच्यापुढे भरतनगर परिसरात हा रस्ता खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. या खडड्यातून सध्या पाणी वाहत असल्याने वाहने घसरत आहेत. यामुळे छोटेमोठे अपघात होत आहे.

Web Title: bhugaon-bhukum road issue