‘भूगाव’ - पुण्याच्या पश्‍चिमेकडे जलदगतीने विकसित होणारे उपनगर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पुण्याच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत दूर वाटणारी उपनगरे आता अगदी शहराच्या कुशीत आली आहेत. उपनगरांतील दळणवळण वाढल्याने तेथील अंतरेदेखील आता कमी वाटू लागली आहेत. या सर्वांमुळे या गावांचा चेहरा-मोहरा बदलला आहे. या सर्वांत पुणे शहराच्या पश्‍चिमेला वसलेले व कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेले ‘भूगाव’ झपाट्याने विकसित होत आहे. प्रगती व विकासाची नवीन व्याख्या या छोट्याशा गावाने प्रस्थापित केली आहे.

पुण्याच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत दूर वाटणारी उपनगरे आता अगदी शहराच्या कुशीत आली आहेत. उपनगरांतील दळणवळण वाढल्याने तेथील अंतरेदेखील आता कमी वाटू लागली आहेत. या सर्वांमुळे या गावांचा चेहरा-मोहरा बदलला आहे. या सर्वांत पुणे शहराच्या पश्‍चिमेला वसलेले व कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेले ‘भूगाव’ झपाट्याने विकसित होत आहे. प्रगती व विकासाची नवीन व्याख्या या छोट्याशा गावाने प्रस्थापित केली आहे.

निसर्गाचे लेणे लाभलेले व शेती आणि पूरक उद्योगांनी बहरलेले हे छोटेसे गाव आज एका नवीन बदलाला सामोरे जात आहे. पायाभूत सुविधा, रिंगरोड, आठ पदरी राज्यमार्ग, शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रगती, मुख्य शहराशी जोडणारा रस्ता यासारख्या अनेक कारणांमुळे अनेकांचे लक्ष ‘भूगाव’ने वेधले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच ‘भूगाव’ला देशाच्या नकाशावर एक खास स्थान प्राप्त होणार, हे निश्‍चित. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील विविध सुखसुविधांवर भर दिला जात आहे. त्यामुळे फक्त पुणे शहरच नाही, तर आसपासच्या अनेक गावांचा विकास होत आहे.

‘भूगाव’मधून पुणे-दिघी या राज्य महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा जात असल्याने या रस्त्याच्या अनुषंगाने होणारा विकास या गावात मोठा बदल घडून आणणार आहे. चांदणी चौकापासून सुरू होणारा आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाला माणगाव येथे जोडला जाणार आहे. तेथून तो पुढे दिघी या विकसित बंदरापर्यंत जाणार आहे. या मार्गावर असणाऱ्या ‘भूगाव’सारख्या अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे.

‘भूगाव’पासून कोथरूड, कर्वेनगर, पाषाण, वाकड, हिंजेवाडी अशी उपनगरे जोडली गेलेली आहेत. पुण्याचे पश्‍चिमद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदणी चौक परिसरात लवकरच एक वाहतूक क्रांती घडत आहे. चांदणी चौकात एक अभूतपूर्व असे रस्त्यांचे आणि पुलाचे जाळे निर्माण होत आहे. या प्रकल्पामुळे या भागातील प्रवास वेगाने आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. वाहतूक नियमन सुरळीत होऊन ‘भूगाव’वरून मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सुलभरीत्या प्रवास करता येणार आहे.

भारत सरकारनिर्मित मेट्रो प्रकल्प ‘भूगाव’च्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. पुणे मेट्रोचा एक मार्ग पुण्याच्या पश्‍चिमेला चांदणी चौक, कोथरूड येथे सुरू होत असून तो पूर्व भागातील रामवाडी येथे संपत आहे. हा मार्ग सुमारे १५ किलोमीटरचा असून, तो १६ स्थानकांना जोडला गेलेला आहे. मेट्रोच्या या मार्गामुळे ‘भूगाव’मधील रहिवाशांना पुण्याच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात जाणे - येणे सोपे होईल. चांदणी चौकातील हे स्टेशन ‘भूगाव’पासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.

पुणे शहराचा विकास घडविणारा रिंगरोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘भूगाव’मधूनच जात आहे. त्यामुळे ‘भूगाव’ आता सर्व पुण्याशी उत्तमरीत्या जोडले जाणार आहे. वाहन उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीमुळे पुणे शहर सर्व दिशांना विस्तारत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने शहर व परिसरातील हमरस्त्यांवर वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाहतुकीच्या गर्दीत वाया जात आहे. रस्त्यांवरील हा ताण कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) रिंगरोड प्रकल्पाची आखणी केली आहे.

रिंगरोडद्वारे पुणे शहराबाहेरील अनेक भाग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. हा रिंग रोड ‘भूगाव’ मधून SKYi च्या ‘सॉंगबर्डस’ या प्रकल्पाच्या अगदी जवळून जात आहे. यामुळे ‘भूगाव’मधील रहिवाशांना पुण्याच्या अनेक भागात सुखकारकरीत्या प्रवास करता येईल. पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, पुणे-सातारा, पुणे-सोलापूर आणि पुणे-अहमदनगर हमरस्ते या रिंगरोडने जोडले जाणार आहेत. याबाबतची अधिक माहिती http://pmrda.gov.in/project-1.html या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

‘भूगाव’मध्ये पुण्यातल्या संस्कृती विद्यालय, श्री श्री रविशंकर विद्यालय, इंडस इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्थांनी शिक्षणाची दालने खुली केली आहेत. ‘भूगाव’ येथून भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा लवळे  कॅम्पस थोड्याच अंतरावर आहे. तसेच एमआयटी कॉलेज, सिंहगड कॉलेजसारख्या प्रख्यात शैक्षणिक संस्था अगदी जवळ आहेत. सह्याद्री हॉस्पिटल, चेलाराम हॉस्पिटल अशी आधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल्स ‘भूगाव’पासून थोड्याच अंतरावर आहे. त्यामुळे ‘भूगाव’मध्ये स्थायिक होणाऱ्यांना चांगल्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे SKYi आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या सहयोगाने SKYi लेक या प्रकल्पात एक आरोग्य केंद्र विकसित 
करण्यात येत आहे. या केंद्रात कन्सल्टिंग रूम आणि खास क्‍लिनिक निर्माण होत आहे. SKYi लेक मध्ये २४ तास ऍम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे.

सर्वांत जलदगतीने विकसित झालेले कोथरूड हे ‘भूगाव’पासून केवळ अडीच किलोमीटर अंतरावर आहे. ‘भूगाव’मध्ये घर घेणारे जास्तीत जास्त ग्राहक कोथरूड आणि त्याच्या जवळील उपनगरातील रहिवासी आहेत. वाढती गर्दी, आकाशाला भिडलेल्या घरांच्या किमती, घरांचे मर्यादित पर्याय आणि खूप कमी मोकळ्या जागा या कारणांमुळे कोथरूड आणि आसपासच्या परिसरातील ग्राहक ‘भूगाव’कडे कमी गर्दी-गोंगाट, शुद्ध आणि थंड हवा, भरपूर हिरवाईने नटलेला निसर्ग, मुबलक पाणी असलेली एक नवीन रहिवासी जागा म्हणून बघत आहेत. तेथील विकास हा अत्यंत काळजीपूर्वक आणि भविष्याचा विचार करूनच केला जात आहे. या सर्व गोष्टी नवनवीन उद्योगांना चालना देणाऱ्या ठरणार आहेत. या नवीन उद्योगांमुळे अनेक लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. ‘भूगाव’ने निसर्गाचा समतोल राखला असून, आपली संस्कृतीही जपली आहे. आजही या गावात विविध उत्सव मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि एकोप्याने साजरे होतात. अशा या गावात निर्माण होत असलेली गृहसंकुले अनेक खरेदीदारांना आकर्षित करत आहेत. शहरापासून फार लांब नाही; पण फार जवळही नाही असे हे ठिकाण. पुण्यातले अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिक या गावात आणि परिसरात उत्तमोत्तम प्रकल्प आखत आहेत, निर्माण करत आहेत.

SKYi ही बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेली कंपनी पुणे शहराच्या पश्‍चिमेला पौड रोडवर ‘भूगाव’जवळ ५०० एकर परिसरात दोन मोठ्या टाउनशिप आणि विविध गृह प्रकल्पांची निर्मिती करत आहे. त्यामध्ये रहिवासी, व्यावसायिक, पेंट हाउस, टाऊन हाउस, फॉरेस्ट होम्स आणि प्लॉट्‌सची आखणी केलेली आहे. आजपर्यंत तब्बल सत्तर लाख चौ. फूट क्षेत्रफळावर बांधकाम केलेले आहे. २०१२ मध्ये कोथरूडजवळ पौड रोड, ‘भूगाव’ येथे तब्बल ५० एकर परिसरात ‘सॉंगबर्डस’ नावाचा गृहप्रकल्पाचा शुभारंभ केला. त्याच्या अभूतपूर्व यशानंतर SKYi लेक, SKYi फर्स्ट SKYi स्टार टॉवर, SKYi स्टार टाऊन आणि टाऊन सेंटर असे विविध प्रकल्प उभारण्यात येत आहेत. आजच आमच्या प्रकल्पाला भेट द्या आणि आपले आपल्या परिवाराचे भविष्य सुरक्षित, समृद्ध आणि सुखी बनवा.
फोन नंबर - 020 67082575
वेबसाइट - www.skyi.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhugav Village Development