भुजबळांना जामीन मिळाला पाहिजे - आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला पाहिजे. तो त्यांचा कायदेशीर अधिकार आहे किंवा त्यांच्यावरील खटला चालविला पाहिजे. चौकशीनंतरही जामीन मिळत नसेल, तर तो गुन्हा आहे,’’ अशा शब्दांत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी भुजबळ यांचे समर्थन केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत  धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. ‘‘भुजबळांविरुद्ध जर गुन्हा सिद्ध झाला, तर पुन्हा तुरुंगात पाठवता येते. मात्र तोपर्यंत तरी त्यांना जामीन हा मिळाला पाहिजे. आज त्यामुळे माळी समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे.’’

धनगर आरक्षणाचे आंबेडकरांकडे नेतृत्व
आगामी विधानसभा निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभे करण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी २० मे रोजी पंढरपूर येथे धनगर समाजाची परिषद आयोजित केली असून, त्यामध्ये पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती समाजाचे नेते आणि माजी आमदार विजयराव मोरे यांनी या वेळी दिली. मंत्री महादेव जानकरांबाबत विचारले असता, त्यांना निमंत्रण देणार नसल्याचे ते म्हणाले.

भारतीय राज्यघटनेनुसार धनगर जमातीचा समावेश अनुसूचित जमातीत आहे. मात्र या समाजाला त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या समाजाने सरकारच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर, माळीसह सर्वच समाजांना त्यासाठी बरोबरच घेऊन ही लढाई लढणार आहे.
- डॉ. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघ

Web Title: Bhujbal should get bail - Ambedkar