1 कोटी 32 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीने खडकवासला पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना करून त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे आमदार पाचर्णे यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमदार निधी, ग्रामपंचायत निधी, 14 वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजना अशा योजनांमधून मंजूर झालेल्या सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) झाले.

यावेळी आमदार पाचर्णे म्हणाले, "कदमवाकवस्ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निधीतून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याबरोबर आगामी काळात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना माझे सदैव सहकार्य राहिल. तसेच कवडी माळवाडी व वाकवस्ती ते गायकवाड वस्ती ते पाषाणकर बाग या दोन रस्त्यांसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच पुढील महिन्यात या दोन्ही रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरवात होणार आहे."

दरम्यान, पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीने खडकवासला पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना करून त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे आमदार पाचर्णे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, चित्तरंजन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी पी. एस. देसाई उपस्थित होते.
   
- भूमिपूजन व उद्घाटन झालेली कामे व त्यासाठी मंजूर झालेला निधी (कंसामध्ये) :- 
१) सिमेंट कॉंक्रिटकरण - एन. एस. रेसिडेन्सी रस्ता (१ लाख ५० हजार), पांडवदंड चेतन पवार घराजवळील रस्ता (१ लाख ६४ हजार), पांडवदंड सागर सावंत घराजवळील रस्ता (१ लाख १ हजार), जमादार सर ते बोरकर सर घराजवळील रस्ता (५ लाख), घोरपडे वस्ती लेन नं. १० (८ लाख), खैरे चाळ (९ लाख १४ हजार).

२) बंदिस्त गटार लाईन - इंदिरानगर (२ लाख), साईरंग बिल्डींग ते शेडेकर घर (१० लाख), आढळेवस्ती (७ लाख १ हजार), नामुगडे वस्ती (१५ लाख), कवडीमाळवाडी सुतारपट्टी (१२ लाख ५९ हजार ५००).

३) साकव व रस्ता - बापदेव मंदिर (२० लाख), केदारीवस्ती (२० लाख).

४) पेव्हिंग ब्लॉक - वसंत घाडगे ते भाई चव्हाण घर परिसर (२ लाख), सागर प्लाझा ते शिवदर्शन सोसायटी (५ लाख), गणगेवस्ती (७ लाख), साळवे वस्ती (२ लाख). 
५) छत्रपती शिवाजी चौक हायमास्ट बसविणे (२ लाख ५० हजार).
६) घोरपडेवस्ती ते राजगृह कॉलनी नळ पाणीपुरवठा जलवाहिनी टाकणे (१ लाख).
 

Web Title: Bhumi Pujan of various development works of 1 crore 32 lakhs