धामणीत चावडीच्या कामाचे भुमीपुजन 

सुदाम बिडकर
मंगळवार, 10 जुलै 2018

पारगाव(पुणे) - धामणी ता.आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने धामणी वेशीजवळील जाधववस्तीतील चावडी दुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन सरपंच सागर जाधव व उपसरपंच वैशाली बोर्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

सदर चावडीची दुरवस्था झाली होती. परिसरातील नागरिकांची खुप दिवसापासुन दुरुस्तीची मागणी होती. दुरुस्तीसाठी एक लाख रुपयांचा निधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, अॅड विठ्ठल जाधव पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन जाधव पाटील, अंकुश भुमकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गवंडी, मिलींद शेळके, सोसायटीचे संचालक सुधाकर जाधव, पांडुरंग ससाणे, चिंतामण जाधव, संजीवन जाधव, दिपक जाधव, राहुल जाधव, शिवाजी जाधव, तान्हाजी गाडेकर, सुखदेव जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of chawdi work