पुणे - पारवडीत बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन 

संतोष आटोळे 
बुधवार, 28 मार्च 2018

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जलसंधारण कामांमुळे आगामी काळामध्ये तालुक्यातील भूजल पातळीमध्ये वाढ होऊन टंचाई दुर होण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले.

पारवडी (ता. बारामती) येथील गावडे-गवंड वस्ती येथे महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंर्तगत व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या प्रयत्नातुन छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातुन सुमारे 55 लाख रुपये निधीच्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ सुनंदा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बारामती तालुका पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, सदस्या लीलाबाई गावडे, बाजार समितीचे संचालक वसंत गावडे, छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संतोष  बुब,  शाखा अभियंता नामदेव ढवळे, सतिश गाढवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत लीलाताई गावडे यांनी तर आभार नामदेव ढवळे यांनी मानले.

Web Title: bhumipujan of parwadi bandhara in pune