बिबवेवाडीत मांजामुळे दोन घुबड जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

बिबवेवाडी - पतंगाचा मांजामुळे जखमी झालेल्या घुबडावर निखिल जावरकर व दिगंबर जावरकर या पितापुत्राने औषधोपचार करून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल केले. 

युनियन बिबलीकल सेमिनरी पाण्याच्या टाकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दाट झाडी असून, विविध प्रकारचे पक्षी परिसरात वास्तव्यास असतात.

पाण्याच्या टाकीच्या रस्त्यावर दिगंबर जावरकर सकाळी फिरायला जात असताना रस्त्याच्या कडेला गव्‍हाणी घुबड (बॅरन आऊल) जातीचे घुबड जखमी अवस्थेत पडले होते. त्याला त्यांनी घरी आणून मुलगा निखिलच्या मदतीने औषधोपचार करून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल केले. तर निखिलला मार्केट यार्डात कांदे-बटाट्याच्या गाळ्यामध्ये जखमी अवस्थेतील शृंगी घुबड (हॉर्न्ड आऊल) जातीचे घुबड जखमी अवस्थेत आढळले होते. पतंगाच्या मांजामुळे पंखाला जखम होऊन ते पडले होते. त्याला कावळ्याने चोच मारून डोळा व पोटावर जखमा केल्या होत्या निखिलने त्याला घरी आणून औषधोपचार करून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल केले.

Web Title: bibwewadi news pune news two owl injured manja

टॅग्स