‘बायसिकल बस’ने आरोग्यदायी प्रवास

गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे : एकेकाळी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता सायकल एका नव्या स्वरुपात पुणेकरांच्या भेटीला आली आहे. चारचाकी आणि सायकल यांचा संयोग असलेल्या ‘बायसिकल बस’ने लवकरच प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी कोणतेही इंधन लागत नाही. ‘बायसिकल बस’ आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तर पूरक आहेच, पण या बसमुळे पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस यावर होणारा खर्चही वाचणार आहे.

पुण्यातील संशोधक मिलिंद कुलकर्णी यांनी ही बस बनवली आहे. याविषयी बोलताना कुलकर्णी म्हणाले, ‘‘या बसमध्ये सध्या आठ लोक व एक चालक बसू शकेल अशी व्यवस्था आहे. आठपेक्षा कमी लोक बसमध्ये बसले असल्यासही बस चालते. सायकल धावते त्याच गतीने ही बस धावते. मात्र, या बसला जास्तीचे गिअर लावून बसची गती भविष्यात वाढविता येऊ शकते. तसेच, बॅटरी व सौरऊर्जेची जोड बसला दिल्यास वृध्द किंवा लहान मुले यांच्यासाठी पॅडल न मारताही बस चालू शकेल. चालवायला सोपी आणि सुरक्षित अशी ही ‘बायसिकल बस’ व्यायामाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.’’

अशी चालते बस 
प्रायोगिक स्वरुपाची ही बस ९ आसनी आहे. या बसमध्ये प्रत्येक आसनाला सायकलप्रमाणे पॅडल दिले आहेत. पॅडल मारल्यानंतर बस धावेल. सायकलप्रमाणेच या बसची कार्यपद्धती आहे. यात बसला गती देण्यासाठी गिअर बॉक्‍स आणि डिफ्रिन्शिएलचा समावेश आहे.

''‘बायसिकल बस’ला डबल डेकरही बनवता येईल. हे प्राथमिक मॉडेल आहे. सध्या व्यायाम आणि काम यांच्यासाठी द्यावा लागणारा वेगवेगळा वेळही वाचेल. तुम्ही तुमच्या कामाला जाताना तुमचा व्यायाम होईल.''
- मिलिंद कुलकर्णी, ‘बायसिकल बस’चे निर्माते