भन्नाट सायकलींच्या संग्रहालयाची सफर (व्हिडिओ)

भन्नाट सायकलींच्या संग्रहालयाची सफर (व्हिडिओ)

पुणे - त्या संग्रहालयात फारच मजेशीर सायकली आहेत. घडी (फोल्ड) करून, पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून सैनिक पॅराशूटमधून उडी मारताना सोबत आणत असत अशी भन्नाट सायकल इथं आहे. दुसऱ्या महायुद्धात ती वापरली गेली आहे.

कर्वेनगरमधल्या सहवास सोसायटीतील हर्ष या बंगल्यात विक्रम पेंडसे यांचं खासगी स्वरूपाचं तीनमजली सायकल संग्रहालय आहे. लहान मुलांच्या तीनचाकी सायकलींबरोबरच मोठ्या माणसांच्या विविध प्रकारच्या गमतीदार सायकली इथं आहेत. पूर्वी सायकलदुरुस्तीची दुकानं कशी असायची, त्याची कल्पना येण्यासाठी हुबेहूब तसंच दुकानही इथं आहे. सायकल वापरण्यासाठी फार पूर्वी परवाना (लायसेन्स) लागायचा. तसे परवाने, हेडलाइट, सीट, बेल यांचे अनेक प्रकार ठेवलेले आहेत.

 या संग्रहातील सायकली बघताना वेळ कधी संपतो ते कळत नाही. इथं येणाऱ्या मुलांना प्रत्येक सायकलींची बारीकसारीक माहिती सांगताना पेंडसे रंगून जातात. मुलांना ते आवर्जून सांगतात, ‘‘सायकल वापरा. याने प्रदूषण तर कमी होईलच, पण सायकल चालवायला किती मजा येते, त्याचा अनुभव घ्या. छान व्यायाम होईल. ’’

सायकलींबद्दलचं कुतूहल, त्यांचा इतिहास व त्यांची निर्मितीसंदर्भात जाणून घ्यायची आवड असल्याने देशभरातून सायकली आणि त्यांचं साहित्य जमवलं. ते जमविताना स्वयंपाकघरातील भांडी, शिवणयंत्र, इस्त्री, काचेच्या बाटल्या आदींचेही मजेशीर नमुने मिळत गेले. तेही इथं ठेवले आहेत. 
-विक्रम पेंडसे, सायकल संग्राहक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com