पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केले मोठे फेरबदल

जनार्दन दांडगे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण)पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी (ता.१७) रात्री पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून सातारा येथून जिल्ह्यात नुकतेच आलेले पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एल.सी.बी.) शाखा सोपवली आहे. तर यापूर्वीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख अधिकारी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत प्रतिबंद कारवाई करण्याची मोहीम सोपवली आहे. तर त्याचबरोबर जिल्ह्यातील आणखी सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या संदीप पाटील यांनी केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा पोलीस दलात फेरबदल होण्याचे अटकळ बांधली जात होती. ती शनिवारी रात्री खरी ठरली. संदीप पाटील सातारा येथे अधीक्षक म्हणून काम करीत असताना त्यांची व पद्माकर घनवट यांची विशेष जोडी जमली होती. घनवट यांनी सातारा येथे स्थानिक गुन्हे अधिकारी म्हणून काम करीत असताना गुन्हेगारी नियंत्रित आणण्यासाठी प्रामाणिक कामगिरी केली होती. घनवट चार दिवसांपूर्वी पुणे जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी सोपवली जाईल अशी पोलीस दलात चर्चा होती. 
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विद्यमान प्रभारी दयानंद गावडे यांची बदली करण्याचे संदीप पाटील यांनी टाळले असून, गावडे यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
 
जिल्ह्यातील बदली झालेल्या अधिकाऱ्याची नावे
धन्यकुमार चांगदेव गोडसे  (पूर्वीचे ठिकाण -  नियंत्रण कक्ष, ते - बारामती तालुका )
तय्युब युनुस मुजावर ( नियंत्रण कक्ष ते आळेफाटा)
पद्माकर भास्करराव घनवट ( नियंत्रण कक्ष, ते  स्थानिक गुन्हे शाखा १ गुन्हे प्रकटीकरण )
दयानंद सदाशिव गावडे (  स्थानिक गुन्हे शाखा ते स्थानिक गुन्हे शाखा २ प्रतिबंधात्मक कारवाई )
सुरेश श्रीपती बोडखे ( नियंत्रण कक्ष तैनात वाहतूक बारामती ते लोणी काळभोर पोलीस स्टेशन )
सुनील बाबुराव गोडसे ( राजगड ते जिल्हा वाहतूक शाखा)
विठ्ठल दिगंबर दबडे ( बारामती तालुका  ते वाहतूक बारामती शहर / तालुका पोलीस स्टेशन)
गणेश रंगनाथ उगले ( आळेफटा ते  जीविशा पारपत्र विभाग )
यशवंत कृष्णा नलवडे ( कल्याण शाखा ते जुन्नर पोलीस स्टेशन )

Web Title: The big changes made by the Superintendent of Police in the police force