'एमसीेए' पदवीबाबत झाला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांना दिलासा

uni.jpg
uni.jpg

पुणे : मास्टर इन काॅमप्युटर अप्लिकेशन (एमसीए) ही तीन वर्षाची पदव्युत्तर पदवी आता दोन वर्षांची असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार अाहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला महत्व प्राप्त होत असल्याने पदवी शिक्षणानंतर 'एमसीए'ची पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. साधारणतः बहुतांश पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा असतो, पण 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थे'च्या (आयएसटीई) नियमावली नुसार 'एमसीए' ही पदव्युत्तर पदवी तीन वर्षांचा करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक वर्ष जास्त जात होते. तसेच 
बीएससी काॅमप्युटर किंवा बीबीए ही पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एमसीए'च्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश (लॅटरल एंट्री) दिला जात होता. 

दरम्यान, प्रथम वर्षाला बी. काॅम किंवा इतर पदवीधर प्रवेश घेतला होते. त्यामुळे 'एमसीए'च्या पहिल्या वर्षाला नाममात्र प्रवेश होत असल्याने प्राध्यापकांचा पगार व इतर खर्च होत होता. त्यामुळे 'एआयसीटीई'ने 'एमसीए'च्या नियमात बदल करावे अशी मागणी अखिल भारतीय पातळीवर होत होती. त्यानुसार जानेवरी महिन्यात 'एआयसीटीई'ने 'एमसीए'ला दोन वर्षांचा अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली. 

"राज्यात सर्वाधिक पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत 'एमसीए'चे शिक्षण देणाऱ्या २८ संस्था असून, यात सुमारे ३ हजार ५००  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 'एआयसीटीई'च्या आदेशानुसार 
'एमसीए'ची पदवी दोन वर्षाची करण्याचा प्रस्ताव विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवला होता, त्यास मान्यता मिळाली. त्यामुळे यंदाच्या वर्षी पासून या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण वाढेल," असे पुणे विद्यापीठाच्या काॅमप्युटर मॅनेजमेंट अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. अमोल गोजे यांनी सांगितले. 

५० टक्के प्रॅक्टीकल नाॅलेज
'एमसीए'चा ५० टक्के अभ्यासक्रम थेअरी तर ५० टक्के प्रॅक्टीकल असा असेल. २५ टक्के भाग आॅनलाईन शिक्षणाचा असेल. सध्या इंडस्ट्रीमध्ये नवीन ट्रेंड असताना विद्यार्थ्यांनाही त्यादृष्टीने तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, जावा, ओरॅकल हे सर्टीफाईड कोर्सही असणार आहेत, असे गोजे यांनी सांगितले. 

नियम बदलाचे फायदे
- विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे एक वर्ष कमी झाले
- लॅटरल एंट्री बंद झाल्याने संस्थांचा खर्च कमी 
- एमबीए, एमएससी एेवजी एमसीएकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल
- नवीन ट्रेंड विद्यार्थ्यांना शिकता येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com