घामाला दाम मिळालं...टोमॅटो, कोथंबिरीने खाल्ला भाव 

tomato
tomato

नारायणगाव (पुणे) : जु्न्नर तालुक्यातील नारायणगाव उपबाजारात टोमॅटो व कोथिंबिरीची आवक घटल्याने बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. लिलावात चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला (वीस किलो) पाचशे रुपये, तर कोथिंबीर जुडीला प्रतवारीनुसार शेकडा चारशे ते चार हजार रुपये भाव मिळाला. या हंगामात मिळालेला हा उच्चांकी भाव आहे.

जुन्नर तालुक्यात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात फळ भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यानंतर भाजीपाला शेतात खराब झाला. त्यानंतर झालेले चक्री वादळ व गारपीट या मुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे शहरी भागात मागणी वाढली. त्यामुळे मागील पंधरा दिवसांत फळ भाजीपाल्याच्या बाजारभावात वाढ होत आहे. चक्री वादळाच्या संकटांतून सावरत असलेल्या उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

नारायणगाव उपबजार आज पंचवीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला २५० रुपये ते ५०० रुपयांच्या दरम्यान असा उच्चांकी भाव मिळाला आहे. कोथिंबीर, मेथी व शेपूच्या १ लाख ३० हजार जुड्यांची आवक झाली. अनुक्रमे शेकडा चारशे ते चार हजार रुपये, पाचशे ते २ हजार ६०० रुपये, सातशे ते सोळाशे रुपये, असा भाव मिळाला.

ओतूर येथील भाजीपाला उपबजार आवारात ४ हजार ८४२ डागांची आवक झाली. या मध्ये सर्वात जास्त १ हजार ४४८ आवक फुलकोबीच्या डागांची झाली. फुलकोबीला प्रति किलो दहा ते आठरा रुपये भाव मिळाला. मिरची, गवार, कारले, भुईमूग, ओली शेंग, कैरीला प्रति किलो वीस रुपये ते चाळीस भाव मिळाला. शेंगवर्गीय फरशी, वालवड, घेवडा यांना उच्चांकी प्रति किलो चाळीस रुपये ते सत्तर रुपये भाव मिळाला.

चक्री वादळामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. नुकसानीमुळे उत्पन्नात घट झाल्याने बाजारभाव वाढला असला, तरी शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होईल, अशी स्थिती या वर्षी नाही.
 - संजय काळे,
सभापती, जु्न्नर बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com