पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

दिवाळीच्या सुटीनंतर सुरू झालेल्या शाळा, बाहरेगावी गेलेले नागरिक परत आल्याने पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी (ता.४) पीएमपीला एका दिवसामध्ये एक कोटी ७९ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

पुणे - दिवाळीच्या सुटीनंतर सुरू झालेल्या शाळा, बाहरेगावी गेलेले नागरिक परत आल्याने पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी (ता.४) पीएमपीला एका दिवसामध्ये एक कोटी ७९ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील काही महिन्यांतील हे उच्चांकी उत्पन्न असल्याचे सांगितले जात आहे.

शहरात सार्वजनिक वाहतूक देणाऱ्या पीएमपीला प्रवाशांची घटती संख्या, ब्रेककडाऊन, जुन्या गाड्या यामुळे घरघर लागल्याचे चित्र आहे. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावरदेखील होत आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्या संपल्याने शहरातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. तर, सुट्ट्यांनिमित्त गावी गेलेले नागरिक शहरात परत आल्याने प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी, पीएमपी प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळाले आहे. दर दिवशी पीएमपी आणि भाडेतत्त्वावरील मिळून सुमारे १४०० ते १५०० बस मार्गावर धावतात. त्यांच्या माध्यमातून पीएमपीला दीड कोटीच्या आसपास उत्पन्न मिळते. मात्र, सोमवारी वाढत्या प्रवासीसंख्येमुळे पीएमपीला १ कोटी ७९ लाख ९० हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती पीएमपी अधिकाऱ्याने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big increase in the revenue of the PMP bus