हिरड्याचे करायचे काय ? आदिवासी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट

वादळामुळे जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील हिरडयाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुक़सान झाले.
hirda growers
hirda growers Sakal Media

जुन्नर : आदिवासी भागातील बाळ हिरडा आदिवासी विकास महामंडळ खरेदी करत नाही, पावसाने नुकसान झालेल्या हिरड्याची शासन नुकसान भरपाई देत नाही तर मग या हिरड्याचे करायचे काय ? असा प्रश्न आदिवासी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना (hirda growers) पडला आहे. वादळामुळे जुन्नर तालुक्यातील (junnar taluka) पश्चिम आदिवासी भागातील हिरडयाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुक़सान झाले आहे. लॉक डाऊनच्या काळात नुकसान झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देऊन आर्थिक आधार देण्याची खरी गरज असल्याचे श्री वरसुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता गवारी यांनी सांगितले. (big loss to hirda growers in junnar taluka)

hirda growers
पुणे : शहरात ७३ केंद्रांवर बुधवारी लसीकरण; ७,५०० डोस उपलब्ध

आदिवासी भागातून बाळ हिरडा काढणीस सुरवात झाली आहे. दरम्यान वादळामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे बाळ हिरडा वाळविण्यास पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. त्यात पाऊस झाल्याने काढणी केलेल्या हिरड्यास बुरशी येऊन तो खराब झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडावरील हिरडा पडून नुकसान झाले तर जो शिल्लक राहिला त्यात बी धरल्याने तो उपयोगी राहिला नाही. यामुळे बाळ हिरड्यापासून मिळणाऱ्या हमखास उत्पन्नापासुन आदिवासी शेतकरी वंचित राहणार आहे.

मागील वर्षी देखील अशा प्रकारे अवकाळी पावसाने बाळ हिरड्याचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले परंतु फळांच्या यादीत हिरड्याचा समावेश नसल्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. त्यामुळे यावर्षी देखील नुकसान भरपाई देणे शक्य नसल्याने सानुग्रह अनुदानाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

hirda growers
पुणे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे या वेळेत राहणार सुरू

आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदी केंद्र गेली चार वर्षांपासून बंद केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडील हिरडा मातीमोल भावाने खासगी व्यापारी खरेदी करत असतात. गेल्यावर्षी २०० ते २५० रुपये भाव मिळाला यावर्षी १६० रुपये किलो दराने खरेदी केला जात असल्याचे सांगण्यात आले. आदिवासी विकास मंडळाचे जुन्नरच्या प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून हिरडा खरेदी बाबत काही सूचना आल्या नाहीत यामुळे बाळ हिरडा खरेदी करण्यात येत नसल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com