'टाकाऊ प्लॅस्टिक पुनर्वापर' कार्यशाळेत महिलांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

'टाकाऊ प्लॅस्टिक पुनर्वापर' कार्यशाळेत महिलांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच इंदापूर नगर- परिषदेच्या वतीने आयोजित 'टाकावू प्लॅस्टिक पुनर्वापर' कार्यशाळेत बचत गटातील महिला आणि महाविद्यालयातील प्लॅस्टिकविरोधी 
फाऊंडेशनचे विद्यार्थी असे एकूण १२३ जण सहभागी झाले होते.

यावेळी टाकावू प्लॅस्टिक बाटल्यांपासून बनविण्यात आलेल्या विविध ४९ घरसजावट तसेच इतर उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रा. भगवान बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ बाटल्यापासून तयार केलेले भूउद्यान तसेच लघूवनस्पती प्रकल्प म्हणजेच जिओगार्डन प्रकल्पाची पाहणी कार्यशाळेतील सहभागी नागरिकांनी करून समाधान व्यक्त केले.

नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, प्लॅस्टिकचा मानवी व प्राणी जीवनावर दुष्परिणाम होत असून त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. त्यामुळे टाकाऊ प्लॅस्टिकचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे महिला 
व विद्यार्थ्यांनी यासंदर्भात कुटुंब व परिसरापासून जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रा. दर्शन दळवी यांनी टाकाऊ बाटल्यांचे दुष्परिणाम व त्यांचा पुनर्वापर कशा पद्धतीने केला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती दिली.

लायन्सस क्लबच्या अध्यक्षा सायरा आतार, सचिव कल्पना भोर, सकाळ तनिष्का ग्रुप प्रमुख सारिका पवार, युवा क्रांती 
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शिताप, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा, आयएमसी सदस्या रश्मी निलाखे, 
भिगवण कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. शिवाजी वीर, प्रा. आत्माराम फलफले, प्रा. 
दत्तात्रय देवकर, प्रा. राधिका घुगे, प्रा. मयूर मखरे, प्रा. रोहन व्यवहारे यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रतिक्षा मते 
आणि आरती चव्हाण तर आभार डॉ. महंमद मुलाणी यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com