अबब! एका लिटरमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी बाईक

सचिन बडे
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पुणे : दुचाकी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर असंख्य प्रकारच्या दुचाक्‍या येतात. अत्यंत महागड्या आणि वेगवान धावणाऱ्या गाड्यांचे हौशी जगात काय कमी नाहीत. पुण्यातील अशाच एका हौशी विद्यार्थ्याने एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी 'बाईक' बनवली आहे. त्याच्या या संशोधनाचे विविध पातळीवर कौतुक झाले आहे. तसेच अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक देखील मिळवला आहे. 

पुणे : दुचाकी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर असंख्य प्रकारच्या दुचाक्‍या येतात. अत्यंत महागड्या आणि वेगवान धावणाऱ्या गाड्यांचे हौशी जगात काय कमी नाहीत. पुण्यातील अशाच एका हौशी विद्यार्थ्याने एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी 'बाईक' बनवली आहे. त्याच्या या संशोधनाचे विविध पातळीवर कौतुक झाले आहे. तसेच अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक देखील मिळवला आहे. 

तर कशी आहे ती 'बाईक' पाहूयात
पुण्यातील अथर्व राजे या विद्यार्थ्यांने सिंबायोसिस विद्यापीठामध्ये बी.टेक करत आहे. शिकत असताना 'प्रोजेक्‍ट' साठी या गाडीची निर्मिती केली आहे. जुन्या ऍक्‍टिव्हा गाडीमध्ये बदल करून तिची 'हायब्रीड बाईक' बनवली आहे. ही बाईक पेट्रोल आणि इलेक्‍ट्रिक दोन्हींवर चालते. तिला 4 बॅटरीज लावण्यात आलेल्या असून या बॅटरीजवर ही गाडी एका वेळेला 32 किलोमीटर धावते. विशेष म्हणजे या बॅटरीज चार्ज करण्याची गरज नसून, गाडी जेव्हा बाईक पेट्रोलवर धावते तेव्हा बॅटरीज ऍटोमॅटिक चार्ज होतात. 

ऍक्‍टिव्हा गाडी एका लिटरमध्ये साधारणपणे 36 किलोमीटर धावते. या 36 किलोमीटरच्या प्रवासात या "बाईकमधील बॅटरीज चार वेळा चार्ज होत असल्याने ही गाडी 36 किलोमीटर आणि बॅटरीजवर 124 किलोमीटर अशी सुमारे 160 किलोमीटर धावते. तसेच ही गाडी 75 टक्‍क्‍यापर्यंत प्रदूषण कमी करते. त्यामुळे ही गाडी पर्यावरण पूरक देखील आहे.

Image may contain: 1 person, motorcycle and outdoor
अथर्वच्या या संशोधनाबद्दल त्याचे विविध स्तरावर कौतुक झाले असून त्याच्या संशोधनाची दखल अनेक स्तरावर घेतली गेली. गुजरात सरकारचा 'एक्‍सेप्शनल इनोव्हेशन आयडिया अवॉर्ड' व केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नॅशनल लेव्हल ऍप्रिशियशन इन इनोव्हेशन सेल कौन्सिलने सन्मानित केले आहे. याबद्दल अथर्व म्हणतो, "इंधनाचे दर सतत वाढत असल्याने सामान्य आणि मध्यमवर्गातील नागरिकांना त्याचा फटका बसतो. यावर मात करण्याच्या उद्देशाने मी ही बाईक बनवली आहे. याचे पेटंट फाइल केले आहे. सर्व प्रकारच्या परवानग्यानंतर भविष्यात अशा प्रकारच्या बाईक तयार करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा पेट्रोलवर होणारा खर्च अत्यंत कमी होणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bike running 160 kilometers in one liter