काय हे! विद्यार्थ्यांची महाविद्यालयांकडे कोट्यवधींची अनामत पडून

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 24 February 2021

उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक शुल्कासह ठराविक रक्कम अनामत शुल्क म्हणून देखील घेतली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे.

पुणे - उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक शुल्कासह ठराविक रक्कम अनामत शुल्क म्हणून देखील घेतली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत विद्यार्थीही अनभिज्ञ असून, संस्था देखील विद्यार्थ्यांना हे शुल्क घेऊन जाण्याची आठवण करून देत नाहीत.

काय होते रकमेचे?
प्रत्येक वर्षी महाविद्यालयांचे ऑडिट होते, त्यामध्ये विद्यार्थी न घेऊन गेलेली रक्कम दाखवली जाते. अनेकदा विद्यार्थ्यांना रक्कम घेऊन जाण्यासाठी आठवण केली जाते. परंतु विद्यार्थ्यांकडून ती परत नेली जात नाही. अशी मागणी न केलेली ‘अन क्लेम डिपॉझिट’ पाच वर्षानंतर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी वापरली जाते, असे एका प्राचार्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनामत रक्कम कशासाठी?

  • प्रवेशादरम्यान परत करण्याच्या अटीवर रक्कम घेतली जाते.
  • वसतीगृह, मेस, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय यासह अन्य कारणांसाठी ५०० रुपयांपासून पुढे शुल्क.
  • महाविद्यालयानुसार शुल्क बदलते.
  • अंतिम वर्षाचा निकाल लागल्यानंतर रक्कमेची परतफेड.

का राहते रक्कम?

  • टीसी, गुणपत्रिका घेतल्यावर विद्यार्थ्यांची महाविद्यालयाकडे पाठ.
  • रक्कम नेण्याबाबत विद्यार्थ्यांची उदासीनता.
  • संबंधित रक्कमेचा महाविद्यालयांकडून वापर.
  • काही महाविद्यालये या ठेवी बँकेत ठेऊन त्यावरील व्याज घेतात.
  • कोरोनामुळे अनेक विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकले नाहीत.

मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल

राज्यातील महाविद्यालये ५ हजार
पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये ३५२
इतर महाविद्यालये ५३८
एकूण विद्यार्थी सुमारे ७.५  लाख

शुल्क निश्चिती व त्यांचे नियमन हे विद्यापीठांकडून केले जाते, याबाबत उच्च शिक्षण खात्याकडे पत्र आल्यास ते विद्यापीठांकडे पाठवून दिले जाईल.
- मोहन खताळ, सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग

अमानत रकमेबद्दल महाविद्यालयांमध्ये नोटीस, माहिती पुस्तकात याबाबत माहिती दिलेली असते. विद्यार्थ्यांनी ठरावीक मुदतीत पैसे न नेल्यास ती रक्कम विकास निधीत वापरली जाते. विद्यार्थ्यांचे पैसे परत करावेत यापूर्वी विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड

राज्यातील महाविद्यालयांत किमान ५०० कोटी रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे. त्यापैकी ३० टक्के रक्कम ही ईबीसी सुविधांसाठी वापरावी.
- अमर एकांडे, सुराज्य विद्यार्थी संघटना

 ग्रंथालय, प्रयोगशाळेसाठी चार हजार रुपये अमानत रक्कम दिली होती, एमएससी झाल्यानंतर ती परत मिळावी यासाठी अर्ज केला आहे.
- गणेश आवारे, विद्यार्थी

मी नुकताच बीएससी झालो आहे, अनामत रकमेबद्दल महाविद्यालयात चौकशी करून रक्कम घेतली जाईल.
- चेतन मुळूक, विद्यार्थी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billions of rupees have been deposited by students in colleges