जैवविविधतेवर आधारित पुस्तकाचे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन

पराग जगताप
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

ओतूर ता. जुन्नर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक डॉ. संजयकुमार रामलाल रहांगडाले व आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील संशोधक डॉ. सविता संजयकुमार रहांगडाले लिखीत व महाराष्ट्र वनविभागाकडून प्रकाशित बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज (Biodiversity Of Durgawadi Plateaus) या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच औरंगाबाद येथे आयोजित १४ व्या वरिष्ठ वनाधिकारी परिषदेत महाराष्ट्र राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे हस्ते झाले.

ओतूर ता. जुन्नर - जैव विविधतेवर आधारीत जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी पठाराची माहिती देणारे 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' या पुस्तकाचे महाराष्ट्र वनविभागाकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

ओतूर ता. जुन्नर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक डॉ. संजयकुमार रामलाल रहांगडाले व आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील संशोधक डॉ. सविता संजयकुमार रहांगडाले लिखीत व महाराष्ट्र वनविभागाकडून प्रकाशित 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' (Biodiversity Of Durgawadi Plateaus) या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच औरंगाबाद येथे आयोजित १४ व्या वरिष्ठ वनाधिकारी परिषदेत महाराष्ट्र राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्रालयाचे सचिव विकास खार्गे, महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यु. के. अग्रवाल, पुणे वनवृत्ताचे मुख्य व वनसंरक्षक विवेक खांडेकर, रहांगडाले दांपत्य व सर्व वरिष्ठ वनाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वनमंत्र्यांनी सदर पूस्तकांचे लेखक डॉ. श्री. व सौ. रहांगडाले यांचे कौतुक केले व संशोधकांनी अशा प्रकारे संशोधन करुन आपल्या वनांच्या संरक्षणासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.

सदर पुस्तकाबाबत रहांगडाले म्हणाले की, जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या दुर्गावाडी पठारावरील जैवविविधता एकत्रित या एका पूस्तक रुपाने प्रकाशित झालेली आहे. वनविभाग महाराष्ट्र शासन यांनी येथील जैवविविधतेची नोंद घेऊन रहांगडाले दांपत्याना सदर स्थानाची संपूर्ण जैवविविधता अभ्यासन्याचे कार्य सोपविले. जुन्नर तालुक्यात दुर्गावाडी पठार हे सह्याद्रीच्या रांगातील अगदी टोकावर वसलेले व तीन भागांत विभागले आहे येथील जैवविविधता अत्यंत समृध्द असून मागील ५० वर्षात किमान १२ प्रकारच्या नविन वनस्पती प्रजाती ४ दगडफुल (लायकेन) प्रजाती तसेच एक पालीची प्रजाती विविध संशोधकांनी शोधून काढल्या आहेत.

या अभ्यासात जैव समृध्दीच्या अभ्यासासोबतच पठारांचे मानवी जीवनातील महत्व व त्यांच्या संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजना हे सुध्दा अभ्यासाचे प्रमुख मुद्दे होते. त्या अनुशंगाने ह्या संशोधक रहांगडाले दांपत्याने अभ्यास करुन आपला अहवाल वनविभागास सादर केला सदर अहवालास आता पूस्तकाचे मुर्त रुप मिळाले आहे.

या पुस्तकात पठारावर आढळणारे सुक्ष्म अधिवास त्यांच्याशी संलग्न वनस्पती प्राणी तसेच देवराया यांत आढळणारी विविधता आहे. यानंतर पठाराचे विविध रुपं म्हणजेच ऋतुप्रमाणे बदल वनस्पतींमध्ये सपुष्प वनस्पती, नेचेवर्गीय वनस्पती, किटक फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, बेडुक, साप, पक्षी व सस्तन प्राणी यांच्या नोंदी आहेत.

वनस्पतीची यादी सध्या प्रचलित असलेल्या नवीन पध्दती (ए. पी. जी. चार) प्रमाणे दिलेली आहे. त्यात एकुण ६०० प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे ह्या ६०० सपुष्प वनस्पतींपैकी सुमारे २५ टक्के म्हणजे १५० वनस्पती ह्या भारतातल्या स्थानिक (स्थानबध्द) वनस्पती आहेत.

नेचेवर्गीय वनस्पती २३ प्रजाती (दोन स्थानबध्द) व प्राणीजगत एकुण १०६ पैकी ६ स्थानबध्द प्राणी प्रजाती आहेत. एखाद्या भुभागात जर एकुण वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या १० टक्के पेक्षा जास्त स्थानबध्द वनस्पती असतील तर त्या भूभागास जैवविविधता समृध्द प्रदेश संमजला जातो.ह्यामुळे दूर्गावाडी पठार हे अत्यंत समृध्द भाग आहे.

या जैवविविधतेने नटलेल्या ठेव्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वात महत्वाचा टप्पा शासनाच्या पुढाकारातून हे पुस्तक प्रकाशन करुन पार पडला आहे. जुन्नर तालुका पर्यंटन तालुका घोषीत झाला असुन पुढील काळात या पुस्तकातील माहिती मुळे पर्यंटकच नव्हेतर जैव विविधता अभ्यासक यांना हे महाराष्ट्र वनविभागाचे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असुन रोजगार वाढीसाठी मदत होणार आहे.

otur junnar

सदर दुर्गावाडी पठाराबद्दल सांगताना घोड प्रकल्प वनविभाग जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे म्हणाले की कास पठाराच्या तोडीचे जैवविविधतेने समृध्द पठार आपल्या वनविभागात आहे व त्याचा सर्वकस अभ्यास हे शाश्वत विकासासाठी व विविधता संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. सदर जैवविविधता आपणांस  निसर्गाची अनमोल देणगी आहे व त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे.कारण शास्वत विकास परस्पर सहजीवनातून शक्य आहे कारण आपले अस्तित्व व आपली ओळख ही जैवविविधता टिकविण्यावर अवलंबून आहे.म्हणून त्यांनी जनतेस निसर्ग संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biodiversity Of Durgawadi Plateaus book inauguration by Forest Minister Sudhir Mungantiwar