जैववैविध्य अभ्यासाचे प्रयत्न बहुमोल - शेर्पा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे  - जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळणे आणि समुद्रसपाटीला प्रदूषण असे टोकाचे दुष्परिणाम दिसतात. अशावेळी कांचनगंगा इको मोहिमेदरम्यान जैवविविध्याच्या अभ्यासासाठी केले जाणारे प्रयत्न बहुमोल ठरतील, असे प्रतिपादन २२ वेळा एव्हरेस्ट सर केलेले विश्‍वविक्रमवीर कामी रिता शेर्पा यांनी केले.

पुणे  - जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळणे आणि समुद्रसपाटीला प्रदूषण असे टोकाचे दुष्परिणाम दिसतात. अशावेळी कांचनगंगा इको मोहिमेदरम्यान जैवविविध्याच्या अभ्यासासाठी केले जाणारे प्रयत्न बहुमोल ठरतील, असे प्रतिपादन २२ वेळा एव्हरेस्ट सर केलेले विश्‍वविक्रमवीर कामी रिता शेर्पा यांनी केले.

‘गिरिप्रेमी’ने पुढील वर्षी आयोजित केलेल्या मोहिमेतील पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. जगातील सर्व १४ अष्टहजारी शिखरे पहिल्या प्रयत्नात सर करून ‘गिनीज बुक’मध्ये नाव कोरलेले मिंग्मा शेर्पा, हिमालयन गिर्यारोहण संस्थेचे प्रमुख देवीदत्ता पांडा, महापौर मुक्ता टिळक याप्रसंगी उपस्थित होते.

मिंग्मा शेर्पा यांनी सांगितले, की प्रत्येक मोहिमेत चढाईपेक्षा निधीचे आव्हान मोठे असते. ‘गिरिप्रेमी’ सरकार, उद्योजक यांचाही पाठिंबा मिळवून करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. महापौर म्हणाल्या, की ‘गिरिप्रेमीमुळे दरवर्षी वेगवेगळ्या शिखरांची नावे कळतात. ते सामान्य माणसाला मोहिमांशी जोडून घेतात. सामाजिक उपक्रमांमुळे ही संस्था वेगळी ठरते.

पश्‍चिम घाट आणि हिमाच्छादित शिखरे यांच्यातील जैववैविध्यात फरक आहे, त्यामुळे इको मोहीम महत्त्वाची ठरेल.’ रॉक क्‍लायंबिंगसाठी महापालिका शहरात ‘वॉल’ उभारेल, अशी घोषणा महापौरांनी केली.

पांडा म्हणाले, की ‘गिरिप्रेमी’च्या आतापर्यंतच्या सर्व मोहिमा सुरळीतच नव्हे तर सुरक्षित पार पडल्या आहेत. काटेकोर नियोजनामुळेच हे शक्‍य झाले.’ मोहिमेचे ‘लीडर’ उमेश झिरपे यांनी सांगितले, की गिरिप्रेमीच्या सहा वर्षांच्या वाटचालीचे श्रेय साहसप्रेमी जनतेला जाते. त्यांच्या साथीमुळे मोहिमा उभ्या राहिल्या. 

व्यासपीठावर श्री साई संस्थान शिर्डीचे डॉ. सुरेश हावरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, क्‍युबिक्‍स मायक्रोसिस्टीमचे प्रमुख विजय जोशी, इंडो शॉटल ऑटो पार्टसचे रामचंद्र राव, उषःप्रभा पागे व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: biodiversity study rita sherpa