शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या संभाजी भिडेंची काय आहे ओळख?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

संभाजी भिडे यांची वादग्रस्त वक्तव्ये :
- माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात.
- मनु हा संत तुकाराम यांच्यापेक्षाही श्रेष्ठ होता.
- अमेरिकाही चंद्रावर यान उतरविण्यासाठी भारतीय कालमापन पद्धतीचा वापर करते
- महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र देशाला गांधी बाधा रोग मिळाला
- देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही.

कोरेगाव भिमा येथे होणाऱया विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात प्रवेशास बंदी घालण्यात आल्याने संभाजी भिडे उर्फ भिडे गुरूजी पुन्हा चर्चेत आले आहेत. भिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आहे. 

वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत प्रकाशझोतात असलेले संभाजी भिडे नक्की आहेत कोण याविषयी जाणून घेऊया....

'या' कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!

Image result for sambhaji bhide

कोरेगाव भीमा संदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संभाजी भिडे यांचा जन्म 1934 मध्ये झाला असून ते मूळचे सांगलीचे. त्यांचे जन्म नाव मनोहर भिडे असे आहे. महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक व प्रमुख आहेत. संभाजी भिडे हे उच्चशिक्षित असून, अणुविज्ञान शाखेत त्यांनी एमएस्सीचे शिक्षण पूर्ण करत सुवर्णपदक मिळविले आहे, असे त्यांचे अनुयायी सांगतात.

शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. शिवप्रतिष्ठान ही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. अशी माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर मिळते. या संस्थेचे भारतीय जनता पक्षाशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकवेळा समोर येतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Related image

सांगलीत भिडेंचे वास्तव्य असून, त्यांचे साधे राहणीमान ही अनुयायांसाठी त्यांची ओळख आहे. सांगलीतल्या अनेक गावांत ते सायकलीवरून फिरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर 32 मण सोन्याचे सिंहासन उभारण्याचे त्यांनी ठरविले असून, त्यासाठी गेल्या अऩेक वर्षांपासून ते प्रयत्न करत आहेत, असे त्यांच्या संस्थेच्या संकेत स्थळावरून म्हटले आहे. 

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती

संकेत स्थळावरील माहितीनुसार, दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम याची सुरवात भिडे यांनीच केली. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा आणि शिवराज्यभिषेक दिन हे कार्यक्रम त्यांनी राबविले आहेत.

Image result for sambhaji bhide

संभाजी भिडे यांची वादग्रस्त वक्तव्ये :
- माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात.
- मनु हा संत तुकाराम यांच्यापेक्षाही श्रेष्ठ होता.
- अमेरिकाही चंद्रावर यान उतरविण्यासाठी भारतीय कालमापन पद्धतीचा वापर करते
- महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र देशाला गांधी बाधा रोग मिळाला
- देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही.

भिंडेवर दंगलीचा गुन्हा आणि आता जिल्हाबंदी
1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या सरकारच्या काळापासून  या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने यावर्षी भिडे यांना या कार्यक्रमात सहभागी न होण्यासाठी पुणे जिल्हा बंदी केली आहे. यावर बोलताना भिडे यांनी अशी काही नोटीस मला मिळाली नसल्याचे म्हटले होते.

यासंदर्भात रविवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावरील गुन्ह्य़ाचा तपास अंतिम टप्प्यात  आहे. हि माहिती  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत. १ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ७४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक  कारवाई करण्यात आली असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी भीमा कोरेगाव परिसरात सार्वजनिक  सभांना परवानगी आहे. मात्र, कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नयेत, यासाठी भाषणांचे ध्वनिमुद्रण केले जाणार आहे, असे पाटील त्यांनी यावेळी सांगितले. शांतात आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस आणि प्रशासनाने यावेळी पुरेशी खबरदारी घेतली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या -
संभाजी भिडे म्हणतात, गांधीबाधा हा देशाला झालेला रोग
संभाजी भिडेंना मातोश्रीवर भेट नाकारली! 
संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biography of Sambhaji Bhide accused of Koregaon Bhima riot