सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा बायोमॅट्रीक हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविण्यापासून सूट दिली होती.मात्र,आजपासून(ता.15)सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना बायोमॅट्रीक उपस्थिती लावणे अनिवार्य केले आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविण्यापासून सूट दिली होती. मात्र, आजपासून (ता. 15) सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना बायोमॅट्रीक उपस्थिती लावणे अनिवार्य केले आहे. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बायोमेट्रिक प्रणालीत पूर्वी अनेकदा त्रुटी आढळून आल्या होत्या. लॉकडाउन काळात कार्यालयातील उपस्थितीचे प्रमाण खूप कमी होते. सेवकांना दिला जाणारा अतिकालीक भत्ता हा बायोमेट्रिक मशिनच्या अहवालाद्वारे न देता तो पूर्वीप्रमाणेच सविस्तर माहिती भरून संबंधित विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीने शिक्षकेतर कक्षामार्फत जमा केला जातो. प्रशासनाने बायोमेट्रिकमधील त्रुटी दूर केल्या आहेत, त्यामुळे उपस्थिती व्यवस्थित लागत आहे. अनलॉकनंतर सर्वच कार्यालये, विभागांमध्ये पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू झाले आहेत. त्यामुळे पुन्हा बायोमेट्रिक प्रणाली लागू केली आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास प्रशासन शिक्षकेतर कक्षाशी 20 ऑक्‍टोबरपर्यंत संपर्क साधावा लागणार आहे. वर्ग दोन ते चार पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबरपासून बायोमेट्रिक प्रणालीमधील उपस्थितीच्या नोंदीनुसार अतिकालीक भत्ता दिला जाईल, असे डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आदेशात नमूद केले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biometric attendance at savitribai phule pune university again