पक्षीनिरीक्षणासाठी पक्षीप्रेमींना सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज - शर्मिला पवार

राजकुमार थोरात
शुक्रवार, 30 मार्च 2018

कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे आज शुक्रवार (ता. 30) ला शरयू फाउंडेशनच्या वतीने उजनी जलाशयामध्ये पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरयू फाउंडेशनच्या वतीने सुमारे 50 नागरिकांना पक्षी निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.

वालचंदनगर - पक्षीप्रेमींना उजनी जलाशयामध्ये पक्षी निरीक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होत अाहे. इंदापूर तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी पक्षीप्रेमींनी सुखसुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे मत शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले.

कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे आज शुक्रवार (ता. 30) ला शरयू फाउंडेशनच्या वतीने उजनी जलाशयामध्ये पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरयू फाउंडेशनच्या वतीने सुमारे 50 नागरिकांना पक्षी निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी पवार यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यासाठी उजनी जलाशय हे एक वरदान आहे. या जलाशयामध्ये युरोप, अमेरिका, कच, सायबेरिया परदेशातून प्रत्येकवर्षी विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी येत दरवर्षी येत असतात. सुमारे 300 प्रकारचे वेगवेगळे पक्षी याठिकाणी पाहायला मिळतात ही पक्षीप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी आहे. पक्षी पाहण्यासाठी राज्यातून अनेक पर्यटकांची गर्दी हाेत आहे. मात्र या पक्षीप्रेमींना सुखसुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत अाहे. शासनाच्या वतीने येथे पर्यटकांसाठी ये-जा करण्यासाठी रस्ता, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता, जलाशयाचे सुशोभीकरण, विश्रामगृहाच्या सुविधा उपलब्ध केल्यास पर्यटन व्यवसासायाला चालना मिळण्यास मोलाची मदत होईल असे सांगितले. यावेळी उद्योजक श्रीनिवास पवार यांच्यासह सुमारे 50 नागरिकांनी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. आलेल्या नागरिकांना डी. एन. जगताप व  विजय शिंदे यांनी पक्षी निरीक्षण करण्यासाठी मोलाची मदत केली. 

पर्यावरण वाचविण्यासाठी मदत करण्याचा शर्मिला पवार यांचा संदेश
उजनी जलाशयावर सध्या अनेक पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी येत आहेत. अनेक नागरिक येताना प्लॉस्टिकच्या बाटल्या,कॅरी बॅग आणत असून उजनी जलाशयाच्या कडेला फेकून देतात.यामुळे पर्यावरणाची हानी होत आहेत. शरयूच्या अध्यक्षा शर्मिला पवार पक्षी निरीक्षण करुन जात असताना जलाशयाच्या कडेला रस्त्यावर पडलेल्या प्लॅस्टिकचा कचरा स्वत: उचलून कचरा कुंडीमध्ये टाकला.व नागरिकांनी  पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्लॅस्टिक कचरा न करण्याचा संदेश दिला.
 

Web Title: Bird care needs to be provided for bird watching said sharmila pawar