पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांकडून पाणवठे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

शिक्रापूर - करंदी (ता. शिरूर) येथील जे. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी तब्बल १५ छोटे पाणवठे आणि विसावे तयार करीत शाळेसाठीचा उन्हाळी उपक्रम यशस्वी केला आहे. पर्यायाने परिसरातील शेकडो पक्ष्यांसाठी छान विश्रामस्थळ झाले आहे.

पाणी आणि अन्नावाचून पक्षांचे हाल होऊ नये, म्हणून करंदी (ता. शिरूर) येथील जे. जे. इंटरनॅशल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात पक्षांचे छोटे वीस ठिकाणी पाणवठे व विसावे तयार केले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांनी सुटीच्या काळात राबवत सुटीचाही उत्तम सदुपयोग केला आहे.

उन्हाळ्यात पाण्याचे आणि अन्नाचे दुर्भिक्ष हा पक्ष्यांसाठी मोठा प्रश्‍न असतो. कमी झालेली वृक्षसंपदा आणि कडक उन्हाळ्याने पक्षीही हैरान आहेत,  मात्र त्यांना भाषा नाही. हीच ती पक्ष्यांची गरज ओळखून शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी पक्षी-पाणवठे आणि विसावे उपक्रम राबवित जागा उपलब्ध करून दिली. यामुळे शाळा परिसरातील पंधरा ठिकाणी विद्यार्थ्यांनी पक्षी येतील. अन्‌ काही विसावा घेतील असे कट्टे केले आहे. गेल्या महिनाभरात शेकडो पक्ष्यांसाठी ते एक विश्रामस्थळ झालेले आहे. 

याबाबत प्राचार्या दिव्या जांभळकर म्हणाल्या, ‘‘शाळा व्यवस्थापन, पालक व काही विद्यार्थ्यांच्या मातांकडून उन्हाळी उपक्रमाची मागणी होती. त्यानुसार आम्ही हा उपक्रम राबविला आहे. यामुळे शाळेतील एकूण ४०० विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून धान्य आणून पक्ष्यांसाठी उन्हाळी अन्नाची व्यवस्था केली तर पाण्याची व इतर साधनसामुग्रीची व्यवस्था शाळेने केली.’’ या उपक्रमामुळे पक्ष्यांना मिळणारा दिलासा हा विद्यार्थ्यांच्या आनंदाचा विषय असू शकतो हे पाहून आम्ही सर्व आनंदी असल्याची प्रतिक्रिया व्यवस्थापिका सुनिता फुके, मिनाक्षी मुदलीयार, विनय चव्हाण यांनी दिली.

Web Title: bird student water