भाजप आमदार विजय काळेंविरोधात झळकले पोस्टर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

पुणे : आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवाल प्रकाशन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी  त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यमंत्री योगेश सागर, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासमोर सुमारे 10 मिनिटे हा प्रकार घडला. 

पुणे : आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवाल प्रकाशन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी  त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यमंत्री योगेश सागर, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासमोर सुमारे 10 मिनिटे हा प्रकार घडला. 

आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आज(ता.24) सायंकाळी 5 वाजता होते. 25-30 भाजप कार्यकर्त्यांनी पत्रके फेकून भाजप कार्यकर्त्यांनी विजय काळें यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला.
vijay kale
'' ज्या कार्यकर्त्यांनी केले तुम्हाला आमदार... त्या कार्यकर्त्यांची लावली तुम्ही वाट... आता तेच कार्यकर्ते तुम्हाला दाखवणार कात्रजचा घाट... - निष्ठावंत कार्यकर्ते, शिवाजीनगर मतदार संघ'' अशा आशयाचे फलक हातात घेवून कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांचा निषेध केला.

आमदार विजयकाळे यांनी कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तसेच पुरेशी विकासकामे झाली नाही म्हणून कार्यकर्त्यांनी हा निषेध केल्याचे समजते. 

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्या हस्ते झाले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, माजी पोलिस अधिकारी वसंत कोरेगावकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Activist Oppose MLA Vijay Kale at Work Report Publication progaram in Pune