संजय राऊतांविरोधात भाजपचे जोडे मारत आंदोलन

पिंपरी - शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.
पिंपरी - शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.

पिंपरी - छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवावा, या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्‍तव्याविरोधात पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘राऊत यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारले. 

पिंपरीतील मोरवाडी येथील भाजप कार्यालयासमोर शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन झाले. या वेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. 

पदाधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार राऊत यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारले. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आंदोलनात उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, राहुल जाधव, सदाशिव खाडे, उमा खापरे, अमोल थोरात, राजू दुर्गे, मोरेश्‍वर शेडगे आदींनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com