भाजप-सेनेमुळे लोकांचे संसार उद्‌ध्वस्त 

BJP and Shivsena politicle efect on pune
BJP and Shivsena politicle efect on pune

शरद पवार यांचा आरोप; राष्ट्रवादीला पुन्हा संधी देण्याचे आवाहन 

पुणे/हडपसर : "सत्ता ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लोकांचे संसार उद्‌ध्वस्त 
करीत आहे. कामगारांची रोजीरोटी बंद केली आहे; तसेच गुन्हेगारांना पावन करण्याचे काम सुरू असून, पुण्यात एका मटका किंगला त्यांनी उमेदवारी दिली,'' असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांना रोखून पुण्याच्या कारभारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा संधी देण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश शेंडगे, जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे, हडपसर विधानसभा अध्यक्ष मंगेश तुपे, कॉंग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष प्रशांत तुपे, माजी उपमहापौर नीलेश मगर, माजी नगरसेवक सुनील बनकर, शिवाजी पवार, कैलास कोद्रे, दत्तोबा ससाणे, सागरराजे भोसले यांच्यासह या मतदारसंघातील दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""विरोधी बाकावर असताना भाजपची मंडळी स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारत होती. सत्ता आल्यानंतर मात्र विकासाऐवजी गुन्हेगारांबरोबर बैठका घेत आहेत. हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा म्हणजे गुन्हेगारांचा आहे. त्यांना पक्षात घेऊन स्वच्छ करून मुख्यमंत्री त्यांना प्रमाणित करीत आहेत. राष्ट्रवादीची महापालिकेत गेली 10 वर्षे सत्ता असल्याने शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले असून, ते मार्गी लावण्याची क्षमता राष्ट्रवादीकडेच आहे. शहरातील पायाभूत सुविधांमुळे उद्योगधंद्याचा ओढा वाढला आहे. गेल्या 10 वर्षांत कर्तृत्ववान महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यांनी जबाबदारीने ती पार पाडली. हे केवळ राष्ट्रवादीच करू शकते. शहराच्या विकासाचे चित्र कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा.'' 
या प्रसंगी प्रभाग क्रमांक 22, राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या उमेदवार चंचला कोद्रे, चेतन तुपे, बंडूतात्या गायकवाड, हेमलता नीलेश मगर; तर प्रभाग 23चे उमेदवार वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, विजय मोरे, योगेश ससाणे यांना पवार यांनी शुभेच्छा दिल्या. 
महापौर जगताप म्हणाले, ""महापालिकेतील कारभार ताब्यात घेण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. त्यांच्यात वर्चस्वाची स्पर्धा आहे. त्यात एक बांधकाम व्यावसायिक आघाडीवर आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या लोकांना उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे शहराचा विकास पूर्णपणे थांबणार आहे. त्यांच्या साठमारीमध्ये पुणेकरांचे नुकसान होणार आहे.'' 
दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीचे सागर भंडारी, मयूर मोरे, मंगेश मोरे, योगेश गवळी, गोरख काळे, अनिल शिंदे, मारुती भद्रावती यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदीप मगर यांनी सूत्रसंचालन केले; तर डॉ. शंतनू जगदाळे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com