कोथरूड परिसरासाठी भाजपचे "ऍप'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

कोथरूड - कोथरूड परिसरातील नागरिकांना त्यांच्या भागातील समस्या महापालिकेकडे नोंदविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने बनविलेल्या "माय स्मार्ट एरिया' या ऍपचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले.

नागरिकांनी ऍपवर त्यांच्या भागातील समस्या मांडली, की त्याची माहिती नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी यांना मिळेल. अधिकारी त्याच ऍपवर समस्येची सद्यस्थिती आणि कामातील प्रगतीची माहिती कळवतील. त्याची माहिती संबंधित नागरिकांना मिळेल. नागरिकांना त्यांच्या समस्येचा पाठपुरावाही करता येईल.

या बाबत मोहोळ म्हणाले, 'पुण्यात महापालिकेच्या पातळीवर पहिल्यांदाच असे ऍप विकसित केले आहे. नागरी समस्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समजतील. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेला कामाचे नियोजन करता येईल. नगरसेवक व नागरिक यांच्यात थेट संपर्क राहील. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनाही त्याचा उपयोग होईल. माय स्मार्ट ऍप हे सुशासनाचे उत्तम उदाहरण ठरणार आहे.''

हे ऍप अँड्रॉईड मोबाईलधारक प्ले स्टोअरवर "मुरलीधर मोहोळ' नाव सर्च करून डाऊनलोड करू शकतात. माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी "थिंक बॅंक' संस्थेने हे ऍप विकसित केले, असे त्यांनी सांगितले.

Web Title: bjp app in kothrud