चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू झाली धावाधाव !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कोथरूडमधील उमेदवारीमुळे 'ट्रोल' होत असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ आता समर्थकांनी धावपळ सुरू केली आहे.

पुणे : कोथरूडमधील उमेदवारीमुळे 'ट्रोल' होत असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ आता समर्थकांनी धावपळ सुरू केली आहे.

पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता कोथरूडमधील डीपी रस्त्यावर आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करतील की नाही अद्याप निश्चित झालेले नसले तरी त्यांना होणारा विरोध कमी व्हावा, यासाठी काही कार्यकर्ते प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे मतदारांचा राग शांत होणार का याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. 

पाटील यांची कोथरूड मधून उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजपच्याच काही कार्यकर्त्यांकडून त्याला विरोध होत आहे. त्या बद्दल बोलताना पाटील यांनी 'मला पक्षाचा आदेश असल्यामुळे मी कोथरूड मधून उमेदवारी स्वीकारलेली आहे', असे सांगितले आहे तसेच 'मी परका नाही' कोथरूडमधील गल्ली-बोळ माझ्या इतके कोणालाही माहिती नाही' अशा आशयाचे ट्विट त्यांनी करून मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. 

परंतु, त्यावर मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता पालकमंत्री यांच्या बचावासाठी नेमके कोण आणि कसे धावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP campaign in kothrud constituency begins