खडकवासला : भिमराव तापकीरांची हॅटट्रीक; दोडकेंनी दिली कडवी टक्कर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात खडकवासला मतदारसंघात थेट लढत झाली.

पुणे : पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भिमराव तापकीर 2500 मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा त्यांनी पराभव केलाय. चुरशीच्या झालेल्या या लढतीत दोडकेंनी तापकीरांना टफ फाईट दिली. तापकीरांना 1,18,627 मतं, तर दोडकेंना 1,16,512 मतं मिळाली आहेत.   

भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात खडकवासला मतदारसंघात थेट लढत झाली.

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019 

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये निर्माण झालेल्या खडकवासला मतदारसंघातून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते. त्यांचे निधन झाल्याने, पोटनिवडणुकीत तापकीर निवडून आले. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये तापकीर पुन्हा विजयी झाली. यावेळी त्यांची हॅट्रीक होणार का, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कोथरूड : चंद्रकांत पाटलांची आघाडी घटली; मनसेची टफ फाईट | Election Results 2019

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Candidate Bhimrao Tapkir won from Khadakwasla Vidhansabha constituency