Loksabha 2019 : ...आणि कांचनताई लाजल्या (व्हिडिओ)

Kanchan Kul
Kanchan Kul

पुणे : आपल्या पतिराजांचे नाव जाहीरपणे घेताना आजही भारतीय महिलांना लाजल्यासारखे होते. मग त्याला लोकसभेच्या उमेदवार तरी कशा अपवाद असतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचेही तसेच झाले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील आपटे सभागृहात झाली. पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप-सेनेचे आमदार पदाधिकारी याबैठकीला उपस्थित होते. उमेदवार म्हणून कांचन कुल बोलायला उभ्या राहिल्या. त्यांनी उपस्थित मान्यवरांची नावे घेण्यास सुरवात केली. आमदार बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर...आदींचा उल्लेख झाला. आता राहिले ते आमदार राहुल कुल. आमदार कुल यांचे नाव घेण्यापूर्वी कांचनताई थोड्याशा थांबल्या. आता नेमकं काय करावे हे त्यांना कळेना. बैठकीस जमलेल्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी क्षणार्धात कांचनताईंना "उखाण्यातच नाव घ्या', असा आग्रह धरला.

कांचनताईंना आता नेमकं काय करायचं हे सुचेना. शेवटी धीटाई दाखवित त्यांनी "उपस्थित आमदार राहुलदादा कुल' असा पतिराजांचा उल्लेख करून स्वत:ची सुटका करून घेतली. उपस्थितांनीही त्यांना टाळ्यांनी दाद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com