पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वाढली

अमित गोळवलकर
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी खुल्या गटातून आपल्या पत्नीला उमेदवारी मागितली होती. उमेदवारांच्या संभाव्य यादीत त्यांचे नावही होते. मात्र,..

कार्यकर्त्याचे पत्नीसह पक्षकार्यालयासमोर उपोषण

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने अन्य पक्षांतून आयात केलेल्या अनेकजणांना ए-बी फाॅर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिल्याने पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

प्रभाग क्रमांक 12 मयूर काॅलनी, डहाणूकर काॅलनी येथून पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी खुल्या गटातून आपल्या पत्नीला उमेदवारी मागितली होती. उमेदवारांच्या संभाव्य यादीत त्यांचे नावही होते. मात्र, आज अगदी ऐनवेळी कोथरुडचे शिवसेना विभागप्रमुख नवनाथ जाधव यांचा पक्षप्रवेश करवून घेत भाजप नेत्यांनी जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. 

यामुळे नाराज झालेल्या जगन्नाथ कुलकर्णी यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या पक्षाच्या निवडणूक कार्यालयासमोर आपली पत्नी, मुलगी व आईसह उपोषण सुरू केले आहे. जगन्नाथ कुलकर्णी यांनी निष्ठावन कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेली असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. 

Web Title: bjp candidates upset with party wooing others, jagannath kulkarni on hunger strike