आम्हीही मतांची भीक मागायला आलो - चंद्रकांत पाटील

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी या गावांच्या खऱ्या विकासासाठी आम्हीही मतांची भीक मागायला आलो असल्याचे स्पष्ट केले
bjp Chandrakant Patil  We also came to beg for votes development of villages
bjp Chandrakant Patil We also came to beg for votes development of villagessakal

मांजरी : गावांचा विकास साधन्यासाठी त्यांना महानगरपालिकेत समाविष्ट केले असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मग जिल्हापरिषदेअंतर्गत त्यांचा विकास का केला नाही, असा सवाल करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी या गावांच्या खऱ्या विकासासाठी आम्हीही मतांची भीक मागायला आलो असल्याचे स्पष्ट केले.

शेवाळेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे व माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या प्रयत्नातून सुमारे तीन हजार नागरिकांना हेल्थ कार्ड, ई-श्रम कार्ड व युनिव्हर्सल कार्डची नोंदणी करण्यात आली आहे. त्याचे काही नागरिकांना प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.आमदार राहुल कुल, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरसेवक मारूती तुपे, जीवन जाधव, डॉ. बाळासाहेब हरपळे, शिवराज घुले, धनंजय कामठे, संदीप हरपळे, गजेंद्र मोरे, डॉ. दादा कोद्रे, स्नेहल दगडे, बापू घुले, उज्वला टिळेकर, छाया गदादे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, "सर्व पक्षांनी एकाच व्यासपीठावर जनतेसमोर यावे आणि पुणे शहराच्या विकासात कोणी किती भर घातली ते सांगावे. गेल्या पन्नास वर्षात त्यांना जे जमले नाही ते व त्याहीपेक्षा जास्त काम आम्ही पाचच वर्षात करून दाखवले आहे. खरे तर येथे नवीन महानगरपालिकेची गरज आहे. सरकारने गावांचे गावपण घालविले आहे. ते टीकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराने पुढे गेले पाहिजे.' राहुल शेवाळे यांनी कोरोना काळात राबविलेले "अटल आरोग्यरथ अभियान' व शेवाळेवाडी गावासाठी सुरू केलेल्या "नरेंद्र मोदी जन आरोग्य योजनेचे' पाटील यांनी यावेळी कौतुक केले.सुनील शेवाळे, शैलेंद्र बेल्हेकर यांनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com