शिवसेनेकडील भोरच्या जागेवर भाजपचाही दावा 

bjpshivsena
bjpshivsena

भूकुम (पुणे) : युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र आता भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यामुळे या जागेवरून युतीमध्ये वादंग होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

भोर, वेल्हे व मुळशी या तालुक्‍यांचा मिळून नव्याने निर्माण झालेल्या भोर विधानसभा मतदारसंघात दोन वेळा संधी देऊनही शिवसेनेला या जागेवर विजय मिळवता आला नाही. तसेच सध्या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी पक्षातील इच्छुकांनी केली आहे. 

भोर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुण्यामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गोरख दगडे, बाळासाहेब गरुड, भगवान पासलकर, ऍड. अण्णा शिंदे, विठ्ठल शेलार, प्रदीप खोपडे, किरण दगडे, ऍड. विनायक ठोंबरे, राजेंद्र बांदल, जीवन कोंडे यांनी मुलाखती दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा भोर येथे रविवारी (ता. 15) होणार आहे. त्या वेळी भाजपचे सर्व इच्छुक त्यांना भेटून भोर मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी लावून धरणार आहेत. मतदारसंघात सर्व मोठ्या गावांत पक्षाची शक्ती मोठी आहे. मतदारसंघातील पूर्व भागात हिंजवडी ते किकवी, केळावडेपर्यंत शहरीकरण झाले असून, लोकवस्ती मोठी वाढली आहे. वाढलेला मतदार भाजपचा आहे. त्यामुळेच पक्षाचा उमेदवार सहज निवडून येईल, असे भाजपचे भोर विधानसभा मतदारसंघाचे संयोजक गोरख दगडे यांनी सांगितले. 

शिवसेनेकडे चौदा इच्छुक 
शिवसेनेतील इच्छुकांच्या मुलाखती मुंबई येथे झाल्या. त्यामध्ये कुलदीप कोंडे, माउली शिंदे, शैलेश वालगुडे, आत्माराम कलाटे, बाळासाहेब चांदेरे, दत्तात्रेय टेमघरे, बाळासाहेब पवळे, संतोष मोहोळ, प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले, मनोज साठे, सचिन खैरे, भानुदास पानसरे, अविनाश बलकवडे यांनी मुलाखती दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com