अमित शहांच्या कार्यक्रमाला भाजपच्याच नगरसेवकांची दांडी

ज्ञानेश सावंत
सोमवार, 9 जुलै 2018

भाजपचे राष्ट्रीय अमित शहा यांच्या व्याख्यानाचा पुण्यातील कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा असला तरी, तो "शत प्रतिशत' यशस्वी करण्यासाठी शहर भाजपने ताकद वापरली. तेव्हा कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी जमविण्यात पक्ष संघटनेला यशही आले, पण पक्षाच्या काही नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. जे कुणी नगरसेवक आले, तेही अगदी "पाहुण्या मंडळीं'सारखीच आली. नगरसेवकांच्या या वागण्याची गंभीर दखल घेत, त्यांना "जाब' विचारण्यासाठी स्थानिक नेत्यांनी बोलविलेल्या बैठकीलाही बहुतांशी नगरसेवकांनी "दांडी' मारली. परिणामी, पक्षाध्यक्षांचा कार्यक्रम नगरेसवकांनी मनावर का घेतला नसावा, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अमित शहा यांच्या व्याख्यानाचा पुण्यातील कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा असला तरी, तो "शत प्रतिशत' यशस्वी करण्यासाठी शहर भाजपने ताकद वापरली. तेव्हा कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी जमविण्यात पक्ष संघटनेला यशही आले, पण पक्षाच्या काही नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. जे कुणी नगरसेवक आले, तेही अगदी "पाहुण्या मंडळीं'सारखीच आली. नगरसेवकांच्या या वागण्याची गंभीर दखल घेत, त्यांना "जाब' विचारण्यासाठी स्थानिक नेत्यांनी बोलविलेल्या बैठकीलाही बहुतांशी नगरसेवकांनी "दांडी' मारली. परिणामी, पक्षाध्यक्षांचा कार्यक्रम नगरेसवकांनी मनावर का घेतला नसावा, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

शहा यांचे "आर्य चाणक्‍य' या विषयावर रविवारी व्याख्यान झाले. हा कार्यक्रम प्रबोधिनीचा असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून शहा यांच्या कार्यक्रमाची पक्ष आणि प्रबोधिनीच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आली. त्याकरिता विविध क्षेत्रातील सुमारे तीन हजार मान्यवरांना विशेष निमंत्रण देत, कार्यक्रमाला "एलिट क्‍लास' जमविण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्याख्यानाला गर्दी होईल, असे गृहीत धरून सुमारे पाच ते सहा हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली. कार्यक्रमाआधी अर्धातास गर्दी होईल का, अशी चिंता संयोजक मंडळींच्या चेहऱ्यावर होती. अखेर गणेश कला क्रीडा मंच भरले पण, अपेक्षित "क्‍लास' मात्र, उपस्थित नसल्याचे गर्दीवरून जाणवले. त्यात, पक्षाचे काही नगरसेवक मात्र, फिरकले नसल्याची चर्चा कालपासून होती. त्याची दखल पक्षाने घेतली असून, त्यावर चर्चा करण्यासाठी तातडीने सोमवारी सायंकाळी महापौर बंगल्यात नगरसेवकांची बैठक बोलविली. तिला मोजक्‍याच म्हणजे 18 ते 20 नगरसेवकांची उपस्थिती राहिल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ही मंडळी कार्यक्रमाला आली होती. त्यामुळे शहांचा कार्यक्रम आणि त्यानंतरच्या बैठकीला 70 ते 80 नगरसेवक हजर नव्हते. गैरहजेरीचे "कारण' द्यावे लागणार असल्याने ते बैठकीला आले नसल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. आधीच संतापलेल्या नेत्यांवर नगरसेवकांचे आभार मानण्याची वेळ आली. 

गोगावले म्हणाले, ""पक्षाचे सर्व नगरसेवक शहा यांच्या कार्यक्रमाला हजर होते. काही जणांना पोचायला वेळ झाला. कार्यक्रम यशस्वी झाला आहे. त्याकरिता नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी ही बैठक घेतली. नगरेसवक शिस्त पाळतात.'' 

Web Title: BJP cooperator absent in amit shaha program in pune