भाजप नगरसेवक गणेश बिडकर यांना लागली गोळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे : भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पायाला गोळी लागल्याची घटना आज (ता.27) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. बिडकर यांना गाडीमध्ये पिस्तूल साफ करताना गोळी सूटुन लागल्याची माहिती मिळत आहे. ​पायाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी तत्काळ रुबी रुग्णलयामध्ये हलविण्यात आले आहे.
 
बिडकर यांच्याकडे पोलिसांचा परवाना असलेली बंदूक आहे.आज सकाळी बिडकर हे वढू जवळ अपटी या गावात त्यांच्या शेतात गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास गाडीतच पिस्तूल साफ करताना 1 गोळी त्यांच्या पायात गेली. सध्या रूबी हॉल रुग्णलयात अतिदक्षता विभागामध्ये बिडकर यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कळत आहे. सध्या त्यांच्या पायातून गोळी काढण्यात आली आहे.  याबाबत पोलिस चौकशी करत आहे. 

Web Title: BJP corporator Ganesh Bidkar got the shot