भाजप आमदारांनी घेतली पिंपरीत नगरसेवकांची झाडाझडती

Laxman-and-Mahesh
Laxman-and-Mahesh

आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी घेतली आढावा बैठक
पिंपरी - शहरातील पाणी प्रश्‍न, अनधिकृत बांधकामे आदी प्रश्‍नांचा आढावा भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (ता. १४) नगरसेवकांच्या बैठकीत घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीत भोसरीत पक्षाचे मताधिक्‍य वाढले व चिंचवडमध्ये कमी झाल्याबाबतची झाडाझडतीही घेतली. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या सात-आठ नगरसेवकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. 

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप (चिंचवड), आमदार महेश लांडगे (भोसरी) यांनी पक्षाच्या नगरसेवकांची प्रथमच बैठक घेतली. त्यात निवडून आल्याबद्दल दोघांचा सत्कार करण्यात आला. पाणी प्रश्‍नावरून पक्षाचे नुकसान होत असून त्याचा विधानसभा निवडणुकीत मतांवर परिणाम झाला आहे. शहरात अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नये, त्यामुळे शहराचा बकालपणा वाढत आहे. यापुढे केवळ परवानगीने बांधकामे होऊ द्यावीत, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही नगरसेवकांना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com