महाशिवआघाडी झाली तरीही पुण्यात भाजपचेच वर्चस्व

BJP dominated in Pune even though Mahashivaaghadi was established.jpg
BJP dominated in Pune even though Mahashivaaghadi was established.jpg

पुणे : राज्यातील सत्तेचा ताबा मिळविताना महाशिवआघाडीचे समीकरण आकाराला आले तरी पुणे महापालिकेतील राजकीय चित्र बदलणार नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या महापौरपदापासून सत्तेतील सर्वच पद भाजपकडे राहणार आहे. महापालिकेत भाजपचे स्वबळ असून या पक्षाचे 99 नगरसेवक आहेत. 

विद्यामान महापौर यांचा कार्यकाळ येत्या 31 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नव्या महापौर पदासाठी येत्या गुरवारी(ता.22) निवडणूक होणार आहे. त्याच वेळी राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहे. त्यामुळे राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. 

काही महापालिकांमध्ये बदल होऊ शकतात असा अंदाज आहे, मात्र पुणे महापालिकेतील महापौर पदासह सर्वच पदे भाजपकडे राहणार आहे. कारण महापालिकेच्या 2017 च्या निवडणूकीत भाजपचे 99 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेतील स्वबळामुळे भाजपला कोणताच धक्का बसण्याची शक्यता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com