पुणे : भाजपच्या माजी आमदाराने घेतली राज ठाकरे यांची भेट; अर्धा तास चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

विधानसभा निवडणुकीत मला सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या आहेत, पण मी कोठेही जाणार नाही असे सांगणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्याने चर्चेला चांगलेच उधान आले आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून, माझ्या कन्येचे लग्न असल्याने त्याचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

पुणे : विधानसभा निवडणुकीत मला सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या आहेत, पण मी कोठेही जाणार नाही असे सांगणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्याने चर्चेला चांगलेच उधान आले आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून, माझ्या कन्येचे लग्न असल्याने त्याचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी पाच वर्ष कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून विधानसभेच्या रिंगणात उतरविण्यासाठी कुलकर्णी यांचा पत्ता कट करण्यात आला. यामुळे भाजपच्या निर्णयावर चांगलीच टीका झाली. या काळात नाराज मेधा कुलकर्णी यांनी बंडखोरी करून पाटील यांच्या विरोधात निवडणुक लढवावी अशी गळ विरोधी पक्षांनी घातली होती. कुलकर्णी यांनी नकार ""माझ्या पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल, पण मी कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना विजयी करणार'' असे सांगितले होते. त्यानंतर 1 लाखाचे मताधिक्‍य मिळणाऱ्या कोथरूडमधून पाटील अवघ्या 25 हजाराने विजयी झाले.

मंगळवारी मेधा कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी सुमारे 25 मिनीटे चर्चा केल्याचे वृत्त समोर आल्याने याची चर्चा रंगू लागली. विधानभा निवडणुकीच्या काळातही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता परत भेट झाल्याने याबाबत राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

याबाबत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, माझ्या मुलीचे लग्न असल्याने त्याची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. शिवसेना भवन येथे जाऊन पत्रीका देणार आहे. सर्वच राजकीय व्यक्तींना मी भेटत असून, ही भेट माझ्या घरगुती कारणासाठी आहे, यामागे राजकीय उद्देश नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Ex MLA Medha Kulkarni Meets MNS Chief Raj Thakreay