पक्षविस्तार झाला अन्‌ उमेदवार मिळाले!

मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पुणे - राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रतिमेचा फायदा झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला शहरात महापालिका निवडणुकीत कधी नव्हे ते पहिल्यांदाच सर्व म्हणजे 162 जागांवर उमेदवार उभे करता आले. अर्थात त्यात त्यांना आयारामांसाठी दरवाजे उघडावेही लागले.

महापालिका निवडणुकीत या वेळी भाजपमध्ये 162 पैकी किमान 50 हून अधिक उमेदवार आयात झाले असल्याचे यादीतून प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. तसेच, उपनगरांतही पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे दिसले. त्यामुळेच उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांची संख्या भाजपमध्ये सर्वाधिक आहे.

भारतीय जनता पक्ष म्हणजे काही भागांपुरता मर्यादित पक्ष, असे यापूर्वी भाजपचे स्वरूप होते. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाची चलती सुरू झाली अन्‌ केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आले. शहरातील आठही आमदार भाजपचेच असल्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला. पक्षाची यापूर्वी कसबा, कोथरूड आणि पर्वती विधानसभा मतदारसंघांतच खऱ्याअर्थाने ताकद होती. संघ परिवार सोबतीला असला तरी उपनगरांत पक्षाचा पुरेसा विस्तार झाला नव्हता. त्यातच शिवसेनेबरोबर युती असल्यामुळे पक्षवाढीला मर्यादा आल्याचे चित्र होते.

महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे चित्र बदलले. पक्षाच्या इच्छुकांची संख्या वाढली. भाजपमध्ये गेल्यास निश्‍चित यश मिळेल, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून अनेक जण भाजपचे कार्यकर्ते होऊ लागले. महापालिका निवडणूक जवळ आल्यावर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पक्षालाही विस्तार करायचा होता. कोणताही पक्ष उमेदवार बरोबर घेऊन जन्माला येत नाही, तसेच भाजपचेही झाले. विविध समाज घटकांतील कार्यकर्ते पक्षात आल्यामुळे उर्वरित पाच म्हणजे खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात पक्षाला आयते उमेदवार सापडल्याचे या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. मात्र, हे आयते आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार घेण्याच्या नादात भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे इच्छुकही घेण्यात आले आणि पक्षावर टीकेची झोड उठविण्यात आली. त्याला उत्तर देताना या इच्छुकांची पार्श्‍वभूमी तपासून मगच उमेदवारी देऊ, अशी सारवासारव पक्षाकडून करण्यात आली. गुन्हे दाखल असलेले कार्यकर्ते सगळ्याच पक्षांत आहेत, असेही पक्षाकडून सांगण्यात आले.

Web Title: BJP found all candidates for Pune Corporation Election