
BJPने ५ वर्षे दूर ठेवलं आता, पराभव...; आजारी बापटांना प्रचारात उतरवण्यावरून NCPची टीका
पुणे - पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्याचं कारण म्हणजे दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते. शिवाय कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र यावेळी कसब्यामध्ये चुरस आहे. सध्याची परिस्थिती पाहता, भाजपने खासदार गिरीश बापट यांना आजारपणातही मैदानात उतरले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर टीका केली आहे. (BJP kept away to girish Bapat for 5 years Criticism of NCP)
जगताप म्हणाले की, खासदार गिरीष बापट यांना आजारपणात प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळत आहे. बापट यांनी आज आजारी असताना भाजप पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापट यांनी केसरी वाड्यात पदाधिकाऱ्यासाठी मेळावा आयोजित केला होता.
जगताप पुढं म्हणाले, गिरीश बापट यांना गेल्या ५ वर्षांपासून भाजपने बाजूला ठेवलं. कसबा पोटनिवडणुकीचा उमेदवार धोक्यात आला आणि भाजपला त्यांची आठवण आली. बापट यांच्या जीवाशी खेळण्याचे काम भाजप करत आहे. पुणेकर यांना माफ करणार नाहीत