esakal | मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी
sakal

बोलून बातमी शोधा

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनात विधवा महिलांना पाच लाख रुपये द्या

नवी दिल्ली : कोरोनाकाळात अनेक महिलांना वैधव्य आले. परंतु राज्य सरकारने त्यांना आधार दिलेला नाही. त्यामुळे या महिलांना एकरकमी पाच लाख रुपये किंवा महिन्याला पाच हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याची‌ सूचना राज्यांना करावी, अशी मागणी कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पंतप्रधान मोदी यांची मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली. पंतप्रधानांना त्यांनी राखीही बांधली. कोरोनाकाळात विधवा झालेल्या महिला, पुण्यातील लसीकरणाचा वेग, शनिवारवाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी मुद्दे त्यांनी या भेटीत मांडले. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘पंतप्रधानांनी सर्व मुद्दे समजून घेतले आहेत. विधवा महिलांचा मुद्दा मी प्रामुख्याने मांडला आहे.’’

अनेक महिलांना कोरोनामुळे पती गमवावा लागला. त्यामुळे त्यांचा आधार कायमचा गेला आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर मुलाबाळांसह संसार चालविण्याची जबाबदारी आली आहे. परंतु, महाराष्ट्रातील सरकारने या महिलांना कोणतीही मदत केलेली नाही. त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना तयार करण्याची गरज आहे, हेही पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. तोपर्यंत या महिलांना पाच लाख रुपये एकरकमी किंवा पाच हजार रुपये महिना द्यावेत, अशी सूचना राज्यांना करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: खडसेंना झटका; ED ने दाखल केलं आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही समावेश

पुण्यातील खासगी रुग्णालयांना कोरोना प्रतिबंधक लसीचा कोटा मिळत नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेगही कमी आहे. त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले, तर मोहिमेचा वेग वाढू शकतो. नागरिक पैसे देऊनही लसीकरण करण्यास तयार आहेत, पण लसीची उपलब्ध कमी आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शनिवारवाडा हा ऐतिहासिक वारसा आहे. पण आतून त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याचा जीर्णोद्धारही करण्याची गरज आहे. त्यासाठी निधीची आणि केंद्रीय पुरातत्त्व खात्याची परवानगी आवश्यक असल्याचे मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले, असे कुलकर्णी म्हणाल्या.

loading image
go to top