'बॅंक गैरव्यवहारात भाजपचेच नेते'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

पुणे - राज्य सहकारी बॅंकेत घोटाळा झाल्याचे सांगत आता अजित पवार यांना गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या प्रकरणात सर्वाधिक भाजपचेच नेते आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सिंचन प्रकरणात काही न सापडल्याने पवार यांच्याविरोधात बॅंक प्रकरण  काढले असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली. या वेळी माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यावर मुख्यमंत्री व भाजपचा प्रयत्न आहे. तसे घडल्यानंतरच त्यांना सत्ता मिळेल, असे वाटते आहे. राजकीय द्वेषातून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत. या आधीही ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाल्याचे सांगून अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आता बॅंक प्रकरणातही तसेच होत असून, त्यातूनही काही हाती लागणार नाही.’’  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघांसाठी सक्षम पर्याय दिला जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

उदयनराजे राष्ट्रवादीतच
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत पाटील म्हणाले, ‘‘उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे उदयनराजे यांचे मन परिर्वतन करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader in Bank scam says Jayant patil