भाजप नेत्यांकडून खडकवासला धरणाच्या पाण्याचे जलपूजन

khadak.jpg
khadak.jpg

खडकवासला : पुणे महापालिका व खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये शहराला पाणी पुरवठा करण्यासंदर्भात करार झालेला आहे. या करारात वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी शहराला दिले जाते. पण सध्या शहराला तो पाणी पुरवठा पुरेसा नाही. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराला साडेअठरा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. याबाबत राज्य सरकारकडून आम्हाला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. अशी अपेक्षा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज खडकवासला धरण येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यावर म्हणजे चारही धरणात 70 टक्के पेक्षा जास्त पाणी जमा झाल्यावर पुण्याच्या महापौर खडकवासला धरण येथे येऊन धरणातील पाण्याचे पूजन करतात.  त्या परंपरेनुसार आज शुक्रवारी जलपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी महापौर बोलत होते.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे व खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, काँग्रेसचे पक्षनेते आबा बागुल, नगरसेवक हरिदास चरवड, जयंत भावे, अजय खेडेकर, धनराज घोगरे, प्रसन्न जगताप, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, राजश्री नवले, नीता दांगट, अश्विनी पोकळे, स्मिता वस्ते प्रभाग समिती सदस्य सचिन दांगट, महानगरपालिकेचे पाणी पुरवठयाचे मुख्य अभियंता, अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता, नंदकिशोर जगताप, कार्यकारी अभियंता मनीषा शेकटकर, उप अभियंता विनोद क्षीरसागर, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता वामन भालेराव, शाखा अभियंता तुळशीदास आंधळे, उमेश सरपाटील, अभिजित धावडे, सुभाष नाणेकर, रमेश धावडे, प्रकाश साळवी, भगवान गायकवाड, बाबा खिरीड, बापू सरपाटील, राजेंद्र भोसले उपस्थित होते.

याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, "खरे तर ही गेली अनेक दिवसांची मागणी आहे. पुणे शहराची वाढती लोकसंख्या व नव्याने समावेश झालेली गावं. यामुळे, संपूर्ण शहराला साडेअकरा टीएमसी पाणी पुरेसे नाही. म्हणून साडेअकरा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. ते पाणी पुणे शहराला मिळावे म्हणून आम्ही वारंवार राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. तसा पालिकेचा मुख्य सभेचा सर्वपक्षीय ठराव देखील झाला आहे. सर्व नगरसेवकांनी हा ठराव एकमताने मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला देखील आहे. आमच्या या संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आम्हाला आशा आहे की, लवकरच राज्य सरकारकडून आमच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल."

आमदार तापकीर म्हणाले, ''पालिकेने जर सर्वसाधारण सभेचा ठराव राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्य सरकारकडे पोहोचल्यानंतर यासंदर्भात आम्ही जलसंपदा मंत्रालय, नगर विकास मंत्रालय यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करू. तसेच या प्रश्नाबाबत विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न, लक्षवेधी व औचित्याचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष याकडे केंद्रित करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शहराला साडेअठरा टीएमसी पिण्याचे पाणी दिल्यानंतर शेतीसाठी देखील अपेक्षित असणारे पाण्याचे नियोजन देखिल करण्यात येणार आहे. सध्या टेमघर धरणातील गळती काढण्याचे काम मागील तीन-चार वर्षापासून सुरू आहे. धरणात जादा झालेले पाणी मुठा नदीत सोडण्याचे ऐवजी कालव्याव्दारे दौंड, इंदापूर, हवेली तालुक्यातील विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव भरून घेण्यात यावे. त्यानंतर दुष्काळ असलेल्या परिसरात देखील शेतीसाठी या पाण्याचा पुरवठा करावा.यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.'' 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com