भाजपचा 'महाजनादेश' उद्या पुण्यात; वाहतूक व्यवस्था काय?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

भाजपची महाजनादेश यात्रा शनिवारी सायंकाळी हडपसर गाडीतळ येथे दाखल होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीही सहभागी असणार आहेत.

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी भाजपची महाजनादेश यात्रा पुण्यामध्ये दाखल होत आहे. या पार्श्‍वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तातून बाहेर आलेल्या वाहतूक पोलिसांना महाजनादेश यात्रेमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजन करावे लागणार असून, त्यादृष्टीने वाहतूक शाखेने प्रयत्न सुरू केले आहेत. 

भाजपची महाजनादेश यात्रा शनिवारी सायंकाळी हडपसर गाडीतळ येथे दाखल होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीही सहभागी असणार आहेत. ही महाजनादेश यात्रा संपूर्ण शहरामध्ये फिरणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची दाट शक्‍यता आहे. परंतु वाहतूक शाखेकडून महाजनादेश यात्रेमुळे वाहतुक कोंडी होणार नाही, यासाठी त्या-त्या वाहतूक विभागाअंतर्गत उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

काँग्रेसला आणखी एक पाटलांकडून धक्का; शिवसेनेत प्रवेश

याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, "दैनंदिन वाहतूक नियोजनामध्येच महाजनादेश यात्रे दरम्यानच्या वाहतुकीचे नियोजन केलेले आहे. ठिकठिकाणी वाहतुक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी वाहतुक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन वाहतुकीचे योग्य प्रकारे नियमन करतील.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP mahajanadesh yatra tomorrow in Pune