भाजपच्या मावळ तालुकाध्यक्षपदी रवींद्र भेगडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मावळ तालुका भाजपची संघटन पर्व २०१९ ही संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेची बैठक येथील पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली होती. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, रामनाथ वारिंगे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, निवडणूक निरीक्षक पांडुरंग ठाकूर, विलास चोंघे, ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, गुलाबराव म्हाळसकर उपस्थित होते.

वडगाव मावळ - मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मावळ तालुका भाजपची संघटन पर्व २०१९ ही संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेची बैठक येथील पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली होती. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, रामनाथ वारिंगे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, निवडणूक निरीक्षक पांडुरंग ठाकूर, विलास चोंघे, ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, गुलाबराव म्हाळसकर उपस्थित होते. 

निवृत्ती शेटे यांनी तालुकाध्यक्षपदासाठी रवींद्र भेगडे यांचे नाव सुचविले. त्यानंतर ठाकूर यांनी तालुकाध्यक्षपदी भेगडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर माजी राज्यमंत्री भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. या वेळी देहूरोड ब्लॉक अध्यक्षपदी बाळासाहेब शेलार यांची निवड जाहीर करण्यात आली. आंबेगाव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. ताराचंद कराळे, वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल श्‍यामराव ढोरे, कामशेत ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिमन्यू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी प्रास्ताविक केले. यदुनाथ चोरघे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप काकडे यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP maval head of Tahsil ravindra bhegade politics