Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांच्या सभेवेळी भाजपचा खोडसळपणा BJP misbehave during Ajit Pawar meeting in Pune BJP workers burst firecrackers while playing drums loudly | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांच्या सभेवेळी भाजपचा खोडसळपणा

पुण्यातील पोटनिवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा विषय राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर महाविकास आघाडीकडून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी उमेदवार देण्यात आला. कालपासून या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला. काल संध्याकाळी अजित पवारांची पुण्यात जाहीर सभा पार पडली. अजित पवार यांची सभा सुरू असतानाच भाजपचा खोडसळपणा दिसून आला आहे.

काल कसब्यातील उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. एकूणच कसबा पोटनिवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अजित पवारांचे भाषण सुरू असताना सभेच्या जवळ भाजपने जोरजोरात फटाके वाजवायला सुरवात केली. महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काल सभा घेण्यात आली होती.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थितीत होते. अजित पवार यांची सभा सुरू असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत मोठा आवाज करत शेजारून रॅली काढली. तर सभेवेळी भाजपने खोडसाळपणा केल्याचा मविआ कार्यकर्त्याचा आरोप आहे. सभा सुरु असतानाच भाजपची रॅली सभेजवळ आली. भाजप कार्यकर्त्यांनी जोरात ढोल ताशे वाजवत फटाके फोडले आहेत.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुका जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडून कंबर कसून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तर भाजपकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. तरीही या निवडणुकीत महाविकास आघाडीने उडी घेतली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.