'बापट साहब, आपके पीए को संभालो' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

पुणे : ''बसचा कंडक्टर ड्रायव्हर होऊ शकतो, असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो, तर खासदारचा पीए खासदार का होऊ नये? गिरीश बापट, तुम्ही तुमच्या पीएला सांभाळा,'' असा टोला लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी लगावला. 

पुणे : ''बसचा कंडक्टर ड्रायव्हर होऊ शकतो, असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो, तर खासदारचा पीए खासदार का होऊ नये? गिरीश बापट, तुम्ही तुमच्या पीएला सांभाळा,'' असा टोला लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी लगावला. 

पुण्यात कोथरूड येथे 'कलम ३७०' वर नामग्याल यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी खासदार गिरीश बापट यांनी बोलताना सांगितले की, ''नामग्याल हे पूर्वी खासदाराचे पीए होते, आता खासदार झाले आहेत.'' हाच धागा पकडून नामग्याल म्हणाले, ''माझी आणि गिरीश बापट यांची पहिली भेट संसदमध्ये ओळखपत्र काढून घेताना झाली. त्यावेळी बापट यांनी तुम्ही काय करता, कुठून खासदार झालात असे विचारले. त्यावेळी मी शिमल्याच्या खासदारांचा पीए होतोटट असे सांगितले. त्यावर बापट अच्छा तुमच्याकडे पीएचा खासदार होत? असा प्रश्न केला. त्याचे उत्तर मी आज देतो. 

''बसचा कंडक्टर ड्रायव्हर बनू शकतो, असिस्टंट प्रोफेसर प्रोफेसर बनू शकतो. तर एक युवा पीए खासदार बनला तर तुम्हा जेष्ठ लोकांना का त्रास होतो?''यासह मला हेही सांगायचे आहे की, ''तुम्ही तुमच्या पीएला सांभाळा, आज काल कोणाचेही अच्छे दिन येत आहेत, असा जबरदस्त टोला लगावला. त्यावर सभागृहात हास्याचे फवारे उडाले, कार्यकर्तांनी टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन दिले. 

दरम्यान, गिरीश बापट यांचा एक पीए शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून तीव्र इच्छुक होता, त्याबाबत शहर भाजपमध्ये चर्चा रंगली होती. त्यातच नामग्याल यांनी बापट यांच्या एका वाक्याला पकडून सभागृहात चांगलीच टोलेबाजी केली. 

नामग्याल नव्हे नामदेव 
''खासदार जमयांग नामग्याल यांचे नाव लक्षात राहत नाही, ते चुकायला नको. म्हणून मी त्याचे नाव नामदेव महाराज ठेवले आहे,'' असे सांगत बापट यांनी त्यांचे बारसे केले. त्यास सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Jamyang Namgyal Taunt Girish Bapat in pune