Pune : भाजप प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी पुण्यात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp national president j-p nadda state executive meeting in pune on thursday

Pune : भाजप प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी पुण्यात बैठक

पुणे : केंद्रातील मोदी सरकारला पूर्ण झालेली नऊ वर्ष, केंद्राच्या योजनांचा प्रचार यासह आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभर घटनात्मक कार्यक्रम राबविण्यासाठी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात गुरुवारी (ता. १८) बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. दिवसभरात तीन बैठका होणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीला नड्डा हे मार्गदर्शन करणार आहेतच. यासाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत.

तर त्याच घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू ॲडोटेरियममध्ये आमदार, खासदारांची बैठक घेणार आहेत, त्यानंतर मंत्रीगटाची स्वतंत्र जे. पी. नड्ड घेणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपतर्फे नियोजन केले जात आहेत.

टॅग्स :BjpPune News