esakal | पुणे : गृहविलगीकरण बंदीस भाजपचा विरोध-
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

पुणे : गृहविलगीकरण बंदीस भाजपचा विरोध

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे ः कोरोना बाधित रुग्णांचे गृह विलगीकरण बंद करून त्याऐवजी विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयास महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विरोध केला आहे. नागरिक व महापालिकेसाठी गैरसोयीचा असून यामुळे महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण वाढणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. तर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शासनाचे आदेश आल्यानंतर कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरण बंद करून त्याऐवजी विलगीकरण केंद्रांमध्ये रुग्णांना ठेवले जाणार आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: पुणे पोलिसांची साथ देणारा ३ पायांचा श्वान पाहिलात? जॉन अब्राहमनेही दिली दाद

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार पेक्षा कमी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त यापेक्षा जास्त आहे. शहरात पहिल्या लाटेत विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. पण दुसऱ्या लाटेत महापालिकेने गृहविलगीकरणावर जास्त भर दिला होता. सध्या सहा केंद्रांमध्ये केवळ २५१ जण आहेत. दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये सोसायटी, बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होती, त्यांच्या घरात स्वतंत्र निवास, स्वच्छतागृहाची सोय होती, त्यामुळे विलगीकरण केंद्रांची गरज पडली नाही. त्यामुळे भाजपने या निर्णयास विरोध केला आहे.

हेही वाचा: पुणे : घरफोडी करणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

‘‘गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय झाल्याचा लेखी आदेश अद्याप महापालिकेला प्राप्त झालेला नाही. शासनाकडून आदेश आल्यानंतर त्याबाबत योग्य कार्यवाही केली जाईल.’’

-विक्रम कुमार, आयुक्त महापालिका

‘‘पहिल्या लाटेच झोपडपट्टीतील नागरिकांची संख्या जास्त होती म्हणून विलगीकरण केंद्र सुरू केले होते. ता पुणे शहरात सरसकट सर्वांचे गृह विलगीकरण बंद करणे महापालिका व नागरिकांसाठी व्यवहार्य नाही. राज्य सरकार आम्हाला मदत काही करत नाही, पण नियम बदलून आम्हाला यंत्रणा उभारण्यास सांगत आहेत.त्यामुळे या निर्णयास आमचा विरोध आहे.’’

-मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

हेही वाचा: पुणे पोलिसांची साथ देणारा ३ पायांचा श्वान पाहिलात? जॉन अब्राहमनेही दिली दाद

‘‘राज्य सरकारचा गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय आकलनीय आहे. पुण्यात गृह विलगीकरणाचे नियम पाळले जात आहेत, जर पुन्हा. एकदा शहरातील रुग्णसंख्या वाढल्यास विलगीकरण केंद्रामध्ये सर्वांना सामावून घेणे शक्य नाही. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेचा ताण वाढविणे योग्य नाही.’’

-जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

विलगीकरण केंद्रांची सध्याची स्थिती

केंद्र - क्षमता - सध्याचे रुग्ण

रक्षकनगर खराडी - २५०- - ५३

संत ज्ञानश्‍वर शाळा, येरवडा -५०० - २३

बनकर शाळा, हडपसर -३०० - ५६

गंगाधाम -१५० - ६५

एसएनडीटी - २५० - १५

औंध आयटीआय - १०० - ३९