भाजपतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

भारतीय जनता पक्षातर्फे रोजा-दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन वाडिया महाविद्यालयाजवळील अंजुमन इस्लामिक हॉलमध्ये करण्यात आले. मुस्लिम नागरिक यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 

मुंढवा : भारतीय जनता पक्षातर्फे रोजा-दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन वाडिया महाविद्यालयाजवळील अंजुमन इस्लामिक हॉलमध्ये करण्यात आले. मुस्लिम नागरिक यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 

या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पी. ए. इनामदार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका लता धायरकर, नगरसेविका मंगला मंत्री, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, डॉ. किरण मंत्री, नगरसेवक अजय खेडकर, गुसशेर शेख, प्रकाश मंत्री, तुषार मंत्री, दिनेश गायकवाड, इकबाल अन्सारी, झाकीर कुरेशी, योगेश पिंगळे, आशिष सुर्वे, अजय पाटोळे आदी उपस्थित होते. 

या वेळी दिलीप कांबळे म्हणाले, ""मानवता हा एकच धर्म आहे, या भावनेतून सर्वांनी एकमेकांचे सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करावेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकोप्याची भावना निर्माण होऊन, जातीय सलोखा राखण्यास मोठी मदत होईल.'' भिमाले यांनी मुद्रा योजनेअंतर्गत नजीर चंचल शेख यांना नवीन रिक्षा घेऊन दिली असून, तिची चावी राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली. 

Web Title: BJP organizes Iftar party